Olive Ridley: गालजीबाग, आगोंद किनाऱ्यावर 187 ऑलिव्ह रिडले कासवांचे आगमन! 18474 अंड्यांचे संवर्धन

Sea Turtles Goa: गालजीबाग किनाऱ्यावर ४३ सागरी कासवांची ४६०३ अंडी घातली, त्यापैकी २३५२ अंड्यातून पिल्ले बाहेर येऊन ती समुद्रात सोडण्यात आली.
Olive Ridley Conservation
Olive RidleyCanva
Published on
Updated on

काणकोण: काणकोणातील सागरी कासव संवर्धन आगोंद व गालजीबाग किनाऱ्यावर आत्तापर्यंत १८७ सागरी कासवांनी १८४७४ अंडी घातली आहेत.

गालजीबाग किनाऱ्यावरील ऑलिव्ह रिडले कासव संवर्धन केंद्रात गालजीबाग येथे राजबाग, कोळंब, पाटणे, बायणा, वार्का बाणावली, मोबोर व तळपण या किनाऱ्यावर घातलेल्या अंड्याचे स्थलांतर केले जाते तर आगोंद किनाऱ्यावर पाळोळे, काब द राम व खोला किनाऱ्यावर घातलेल्या अंड्याचे स्थलांतर करून त्याचे संवर्धन केले जाते.

गालजीबाग किनाऱ्यावर ४३ सागरी कासवांची ४६०३ अंडी घातली, त्यापैकी २३५२ अंड्यातून पिल्ले बाहेर येऊन ती समुद्रात सोडण्यात आली. यावेळी १९१ पिल्ले समुद्रात सोडण्यापूर्वीच मेली. आगोंद किनाऱ्यावर आतापर्यंत १४२ सागरी कासवांचे आगमन होऊन त्यांनी १३७६६ अंडी घातली. त्यापैकी ३८१७ अंड्यातून पिल्ले बाहेर आली.

अन्य किनाऱ्यावर १०५ अंडी होती त्यातील ९७ पिल्ले बाहेर आली दोन्ही किनाऱ्यावरून एकूण ६२६६ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. आगोंद किनाऱ्यावरील घरट्यात ८८७ अंडी नाही, तर १११५ पिल्लांना समुद्रात सोडण्यापूर्वीच मरण आले.दोन्ही किनाऱ्यावरील १३११ पिल्लांना मरण आले. ३ मार्चपर्यंत ११० सागरी कासवांचे आगमन आगोंद व ३९ आगमन गालजीबाग किनाऱ्यावर झाले.आगोंद किनाऱ्यावर ११० घरट्यातून ११११४ व गालजीबाग किनाऱ्यावर ३९ घरट्यात ४२४३ अंडी घातलेली होती.

Olive Ridley Conservation
Olive Ridley: किनाऱ्यावर पर्यटकांच्या पार्ट्यांमुळे, गाड्यांमुळे कासवे परत गेली? वागातोरला 'टर्टल नेस्टिंग साईट'ची गरज

३ मार्चपर्यंत या दोन्ही किनाऱ्यावर १४९ सागरी कासवांचे आगमन होऊन त्यांनी १५३५७ अंडी घातली होती. अठ्ठतीस दिवसात अठ्ठतीस नवीन कासवाचे दोन्ही किनाऱ्यावर आगमन होऊन त्यांनी ३११७ अंडी घातली आहेत. घरट्यातून पिल्ले बाहेर पडण्यासाठी सुमारे ४५ ते ५० दिवसांचा कालावधी लागतो, असे वन खात्याच्या दक्षिण गोवा सागरी झोनचे उपक्षेत्रीय वनाधिकारी राजेश नाईक यांनी सांगितले.

Olive Ridley Conservation
Olive Ridley: ‘ऑलिव्ह रिडलेंचे’ जतन सागरी परिसंस्थेचे रक्षण करण्यासाठी! मोरजीत कासव संवर्धन चर्चासत्रात मान्यवरांचे प्रतिपादन

हवामान बदलाचा परिणाम!

कासवाचे आगमन हवामानावर अवलंबून असते. हवामान बदलाचा परिणाम सागरी कासवांच्या आगमनावर होऊ शकतो. मात्र ज्या किनाऱ्यावर ज्या पिल्लांचा जन्म झाला, ती पिलं प्रजाजन सक्षम्य झाल्यानंतर अंडी घालण्यासाठी जन्म घेतलेल्या किनाऱ्यावर येत असतात. राज्यात कासव संवर्धन केंद्र परिसरात कासवांसह अंड्याचे संरक्षण करणे गरजेचे आहे, त्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे, असे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com