Olive Ridley: ‘ऑलिव्ह रिडलेंचे’ जतन सागरी परिसंस्थेचे रक्षण करण्यासाठी! मोरजीत कासव संवर्धन चर्चासत्रात मान्यवरांचे प्रतिपादन

Olive Ridley Conservation Morjim: विद्या प्रबोधिनी महाविद्यालयाने त्यांच्या निसर्ग क्लबच्या माध्यमातून ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांच्या संवर्धनावर एक अत्यंत माहितीपूर्ण चर्चासत्राचे आयोजन केले.
Olive Ridley Conservation
Olive RidleyCanva
Published on
Updated on

पणजी: ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांचे संवर्धन हे केवळ प्रजातींचे जतन करण्याबद्दल नाही तर संपूर्ण सागरी परिसंस्थेचे रक्षण करण्याबद्दल आहे, ज्याचा थेट परिणाम हवामान आणि मानवी समुदायांवर होतो,असे प्रतिपादन राज्य हवामान बदल कक्षाच्या प्रकल्प शास्त्रज्ञ डॉ. अपूर्वा सावंत यांनी केले.

जागतिक वन्यजीव दिनानिमित्त, विद्या प्रबोधिनी महाविद्यालयाने त्यांच्या निसर्ग क्लबच्या माध्यमातून ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांच्या संवर्धनावर एक अत्यंत माहितीपूर्ण चर्चासत्राचे आयोजन केले. सदर चर्चासत्र हे कासवांच्या घरट्यांचे प्रमुख ठिकाण असलेल्या टेंबवाडा -मोरजी येथे आयोजित केले होते.

डॉ. सावंत यांनी हवामान बदल आणि वन्यजीव संवर्धन यांच्यातील परस्पर संबंधांबद्दल त्यांचा दृष्टिकोन मांडला. त्यांनी समुद्राचे वाढते तापमान, प्रदूषण आणि किनारपट्टी विकासाचा कासवांच्या घरट्यांवरील परिणामांवर चर्चा केली आणि विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना धोक्यात असलेल्या प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी शाश्वत पद्धतींचा अवलंब करण्याचेही आवाहन केले.

Olive Ridley Conservation
Olive Ridley: किनाऱ्यावर पर्यटकांच्या पार्ट्यांमुळे, गाड्यांमुळे कासवे परत गेली? वागातोरला 'टर्टल नेस्टिंग साईट'ची गरज

या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश हा सागरी जीवनाचे, विशेषतः धोक्यात आलेल्या ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांच्या प्रजातींचे जतन करून कासवांच्या आवश्यकतेबद्दल जागरूकता निर्माण करणे हा होता. वन्यजीव आणि पर्यावरण-पर्यटन उत्तर विभाग, गोवा राज्य हवामान बदल कक्ष यांच्या सहकार्याने हे चर्चासत्र आयोजित केले होते. ‘निसर्ग क्लब’चे समन्वयक डॉ. उध्दव पोळ यांनी प्रास्ताविक स्वागत केले. आत्माराम गावस, सहयोग पेडणेकर, वनरक्षक शिवानंद गावस, चंदू नाईक, तसेच एव्हलिन डिसिल्वा, प्रतीक शेट्ये,सलोनी काकोडकर उपस्थित होत्या.

सागरी परिसंस्थांचे महत्त्व, विशेषतः समुद्री पर्यावरणाचे आरोग्य राखण्यात ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांची भूमिका महत्त्वाची असते. त्यांनी कासवांच्या संवर्धनात सामूहिक प्रयत्नांची तातडीची गरज आहे. पाण्याखालील जीवनाचे संतुलन राखण्यात हे सागरी प्राणी महत्त्वाची भूमिका बजावतात. ‘ऑलिव्ह रिडले’ कासवे केवळ आपल्या सागरी वारशाचा भाग नाहीत, तर आपल्या महासागरांच्या आरोग्याचे एक महत्त्वाचे सूचक आहेत. त्यांचे संरक्षण भविष्यातील पिढ्यांसाठी निरोगी सागरी परिसंस्था सुनिश्चित करते.

आत्माराम गावस,आरएफओ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com