Old Goa: जुने गोवेत धर्मांतराचा प्रकार उघड; गुन्हा दाखल; दोन महिलांच्या विरोधात गुन्हा नोंद

Old Goa: जुने गोवे येथे धर्मांतराचा प्रकार उघडकीस आला असून दोन महिलांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Goa Police
Goa PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

Old Goa: जुने गोवे येथे धर्मांतराचा प्रकार उघडकीस आला असून दोन महिलांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ताळगाव येथील जी.ए. फर्नांडिस आणि सोमंग अशी संशयितांची नावे आहेत. चंदन गुप्ता (चिंबल) यांच्या तक्रारीवरून भादंसंच्या कलम २९५ (अ), २९८ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Goa Police
Sky Lantern Selling : आकाशकंदील विकून संसाराला हातभार; पागी कुटुंबाचा आदर्श

प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक कीर्तिदास गावडे करत आहेत. हा प्रकार सोमवारी (ता.६) रात्री घडला. तेव्हा चंदन गुप्ता यांच्या तक्रारीवरून जुने गोवे पोलिसांनी कारवाई केली. तेव्हा त्यांना संशयित फर्नांडिस घटनास्थळी सापडली. फर्नांडिस हिने आपली आणखी एक सहकारी असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.

Goa Police
54th IFFI: ‘नवा रंग नवा साज’

पोलिसांनी कलम ४१ अंतर्गत चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस संशयित महिलांना बजावली आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर, काही हिंदू संघटना जुने गोवे पोलिस ठाण्यावर आल्या. उत्तर प्रदेश येथील एका कुटुंबाला बिलिव्हर्स फिरून धर्मांतर करत असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच हिंदू हिताचे रक्षण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com