Old Goa: आई, भावासोबत रहायचे नाही; ओल्ड गोव्यातील 13 वर्षीय मुलाने घर सोडले अन्...

तेरा वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार ओल्ड गोवा पोलीस ठाण्यात दाखल झाली.
Old Goa
Old GoaDainik Gomanatak
Published on
Updated on

Old Goa: तेरा वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार ओल्ड गोवा पोलीस ठाण्यात दाखल झाली. पोलिसांनी तात्काळ मुलाच्या शोध घेण्यासाठी पथके तयार केली अन् अवघ्या तीन तासांत पोलिसांनी बेपत्ता मुलाचा शोध घेतला.

मुलाची चौकशी केली असता आई, भावासोबत रहायचे नसल्याने त्याने घर सोडल्याची माहिती समोर आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली. मुलाचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली, त्यापैकी एका पथकाला मुलगा सापडला.

नोकरीनिमित्त मुलाचे वडील विदेशात असतात. त्यामुळे तो आई आणि भावासोबत राहतो. दरम्यान, आई आणि भावासोबत रहायचे नसल्याने त्याने घर सोडल्याचे त्याने सांगितले.

दरम्यान, मुलाने केलेल्या खुलास्यामुळे पोलीस देखील काही काळासाठी चक्रावले.

मुलाने आई आणि भावासोबत राहण्यास नकार दिल्याने पोलिसांना मुलाला बाल कल्याण समितीकडे सोपविले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Nepal Flood Rescue Video
Nepal Flood Missing People
Nepal Flood Missing Persons
Rahul's mother makes emotional appeal to Deepvihar school principal
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com