Old Goa: उघड्यावर मद्यपान करणाऱ्या 10 जणांना ओल्ड गोवात अटक, पोलिसांची विशेष मोहीम

गोव्यात उघड्यावर दारू पिण्यास मनाई आहे शिवाय त्यासाठी दंड ते अटक अशी तरदूत देखील आहे.
Old Goa Police arrested 10 people for drinking alcohol in public places
Old Goa Police arrested 10 people for drinking alcohol in public placesDainik Gomantak

Old Goa Police arrested 10 people for drinking alcohol in public places: गोव्यात सार्वजनिक ठिकाणी, उघड्यावर दारू पिण्यास मनाई आहे शिवाय त्यासाठी दंड आणि कारवाईची तरदूत देखील आहे. दरम्यान, काहीजण राजरोसपणे नियमांचे उल्लंघन करत सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करतात. ओल्ड गोवा पोलिसांनी या विरोधात विशेष मोहीम राबवत दहा जणांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओल्ड गोवा पोलिसांनी विशेष मोहिम राबवत सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून शांतता भंग करणाऱ्या दहा जणांना अटक केली आहे. पोलिसांनी रायबंदर, खोर्ली, ओल्ड गोवा, चोडण, दीवार या परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली.

सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यास मनाई असताना नियमाचे उल्लंघन करून, शांतता भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली. दरम्यान, पर्यटक आणि स्थानिक देखील नियमाचे उल्लंघन करत असतात.

Old Goa Police arrested 10 people for drinking alcohol in public places
Bicholim: लाडफे गावातील मंदीरातून चोरट्यांनी फंडपेटी पळवली, दहा हजारांची रक्कम चोरी

उघड्यावर मद्यपान एक मोठी समस्या

गोवा सरकारने सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यास सक्त मनाई केली आहे. दरम्यान, काहीजण नियमांना धाब्यावर बसवत त्याचे उल्लंघन करतात. राज्यातील विविध मोकळ्या ठिकाणी काही बेफिकीर लोक मद्यपान करत असतात.

राजधानी पणजीत देखील उघड्यावर अनेक ठिकाणी काहीजण मद्यपान करताना आढळून आले आहेत. मागील वर्षी गोवा सरकारच्या वतीने याबाबत नियमावली प्रसिद्ध करत राज्यात करायच्या आणि करण्यास मनाई असलेल्या बाबींची माहिती दिली होती.

त्यासाठी मनाई असलेल्या गोष्टी केल्यास त्यासाठी असणारी दंडाची रक्कम आणि शिक्षेची तरदूत याची माहिती दिली होती. दरम्यान, या ,सूचनांकडे लोक दुर्लेक्ष करताना दिसत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com