Old Goa : जुने गोवे वारसास्थळ बनले कचरास्थळ; ठिकठिकाणी ढिगारे

Old Goa : प्लास्टिक जाळले जात असल्याने वाढते प्रदूषण
Garbage
Garbage Dainik Gomantak
Published on
Updated on

प्रसाद सावंत

Old Goa : तिसवाडी, जागतिक वारसा स्थळ असलेल्या जुने गोवे परिसरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा साचून राहीला आहे. वारसा स्मारकांच्या अगदी बाजूला कचरा पडलेला आहे.

एवढेच नव्हे, तर कचऱ्याला खुले आम आग लावली जात असून प्लास्टिक जळल्यानंतर निर्माण होणारा उग्र दुर्गंध परिसरात पसरतल्याने पर्यटक उद्योगाशी निगडित घटकांनी चिंता व्यक्त केली आहे.

जुने गोवेत जागतिक दर्जा मिळालेल्या चर्च असून त्या पाहण्यासाठी मोठ्या संख्येने देशी व विदेशी पर्यटक येतात, परंतु हल्ली जुने गोवेत बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या बाजूला कचरा फेकल्याचे आढळून येत आहे.

मुख्य म्हणजे वारसा स्थळांच्या बाजूला असे प्रकार होत असल्याने पर्यटन घटकांमध्ये चिंता वाढली आहे. वारसा स्थळांच्या संवर्धनासाठी ‘बफर झोन’ तयार केला असला, तरी कचरा फेकण्याचे प्रकार घडत आहेत. या प्रकारामुळे स्थानिक जुने गोवे पंचायतीच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न विचारले जात आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून जुने गोवे हा वादाचा केंद्र बिंदू ठरत आहे. वादग्रस्त बंगला असो किंवा अदृश्य घरे, चुकीच्या कारणांसाठी जुने गोवेचे नाव पुढे येत आहे.

जुने गोवे पंचायतीच्या भूमिकेबद्दल देखील सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता राज्यातील प्रमुख वारसा स्थळ असलेल्या ठिकाणी कचरा खुलेआम फेकला जाणे आणि त्या पलिकडे जाऊन जाळणे ही बाब धक्कादायक असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

Garbage
Goa Crime Case: हळदोणे येथे पूर्ववैमनस्यातून सुरी हल्ला; तिघांवर गुन्हा

पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा गोव्यात आले होते, तेव्हा नावेली ते बेतुल या टप्प्यातील सर्व ठिकाणी कुठेही प्लास्टिक किंवा इतर कचरा दिसत नव्हता. सरकार आणि स्थानिक संस्थांना पाहिजे असेल, तर हे शक्य असल्याचे यावरून दिसून आले. गोव्यातील पर्यटन उद्योगासाठी कचरा ही प्रमुख समस्या आहे. वेळेत या समस्येवर तोडगा काढला नाही, तर भविष्यात ही डोकेदुखी ठरणार आहे.

- सावियो मसाएस, माजी अध्यक्ष, टीटीएजी

जुने गोवेत जागतिक वारसा स्मारके आहेत, तेथे रस्त्याच्या बाजूला कचरा फेकणे आणि जाळण्याची घटना घडत असल्याने पर्यटकांत चुकीचा संदेश जात आहे. स्थानिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यात स्थानिक संस्था म्हणजे पंचायत किंवा नगरपालिका यांची भूमिका महत्त्वाची आहे. कचरा होणार नाही याची जबाबदारी स्थानिक संस्थांची आहे.

- नीलेश शहा, अध्यक्ष, टीटीएजी

जुने गोवे परिसरात कचरा फेकला जाण्याची बाब धक्कादायक आहे. आता वारसा स्थळांच्या जवळ कचरा जाळला जात असल्याचे आमच्या नजरेस आले असून दोषींवर कारवाई केली जाणार आहे. तसेच कचरा फेकणाऱ्याविरुद्धही कारवाई करणार आहे.

- मेधा पर्वतकर, सरपंच, जुने गोवे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com