पेडणे नगरपालिकेची पुरातन इमारत पूर्ण पाडु नये; नागरिकांची मागणी

पेडणे नगरपालिकेची पोर्तुगीज कालीन इमारत पूर्णपणे न मोडता ने स्टक्चर आहे तसेच ठेवून दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक नागरिक शेखर पेडणेकर, भाजपचे जेष्ठ कार्यकर्त्ये व्यंकटेश घोडगे आणि कलाकार हरी पार्सेकर आदींनी केली आहे.
पेडणे पालिका इमारत
पेडणे पालिका इमारतDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: पेडणे (pernem) नगरपालिकेची (municipality) पोर्तुगीज कालीन इमारत पूर्णपणे न मोडता ने स्टक्चर आहे तसेच ठेवून दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक नागरिक शेखर पेडणेकर, भाजपचे जेष्ठ कार्यकर्त्ये व्यंकटेश घोडगे आणि कलाकार हरी पार्सेकर आदींनी केली आहे. पेडणे नगरपालिकेची खूप जुनी जी पौर्तुगीज कालीन इमारत ज्याची मालकी हक्क रावराजे देशप्रभू यांच्याकडे होते, त्यांनी पेडणे पालिकेच्या प्रशाशकीय कामकाजासाठी हि इमारत दानपत्रात देण्यात आली होती. एक उत्कृस्ठ बांधकाम नमुना म्हणून हि जुनी इमारत पेडणे शहराची शान वाढवत होती.आर्थिक संकटामुळे घर उभारणी प्रक्रिया लांबणीवर; सरकारकडूनही अन्याय

पेडणे पालिका इमारत
आर्थिक संकटामुळे घर उभारणी प्रक्रिया लांबणीवर; सरकारकडूनही अन्याय
पेडणे पालिका इमारतीचा आराखडा
पेडणे पालिका इमारतीचा आराखडाDainik Gomantak

तीच इमारत आता पूर्णपणे पाडून त्याठिकाणी सुडा मार्फत ८ कोटी रुपये खर्च करून पहिल्या टप्प्यातील प्रसाश्कीय नवीन इमारत प्रकल्प उभारण्याची योजना आखली आहे. आणि या नवीन प्रकल्पाचा शुभारभ पेडणे दसरोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर करण्यात येणार आहे.

पेडणे पालिका इमारत ते वाचनालय हि इमारत मोडून त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यातील इमारत उभारून त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात मासळी मार्केट येथील दुकाने मोडून त्या ठिकाणी विस्तारित प्रकल्प उभारण्याची योजना आहे आणि त्याला पालिकेचे मंजुरी मिळालेली आहे.

सध्या पालिकेने आपला कारभार पेडणे बसस्थानकातील कार्यालयात महिन्याला दरमहिना ३० हजार रुपये भाडे देवून कामकाज सुरु केले आहे.

सध्या पलीकेकडे महसूल वाढवण्यासाठी कोणत्याच नवीन योजना नाही. हा प्रकल्प उभारला तरच पालिकेला वर्षाकाठी लाखो रुपये महसूल मिळू शकतो.

पेडणे पालिका इमारत
Goa: प्रत्येक बूथवर केजरीवालांची 'रोजगार हमी' पोहचविण्यासाठी आप सज्ज

कलाकार हरी पार्सेकर यांनी प्रतिक्रिया देताना आपण एक कलाकार आणि निसर्गप्रेमी आहे. पेडणे पालिकेची हि पुरातन इमारत एक चांगली वास्तू आहे. पेडणेची शान आहे. प्राचीन इमारतीला धोका पोहचू देवू नये. आपण कलाकार म्हणून आपल्याला खूप दुखः होणार जर हि इमारत पूर्ण पणे मोडून टाकली तर. तसे केले तर आपला व्ययक्तीक विरोध आणि निषेध असल्याचे सांगितले. इमारत आहे तशी ठेवून जर दुरुस्ती करत असेल तर आपल्याला खूप आनंद होणार आणि आपण पालिकेला धन्यवाद देईन असे सांगून राजकीय पक्ष , कार्यकर्ते सामाजिक संघटना या सर्वांनी एकत्रित येवून हि इमारत वाचवण्याची गरज असल्याचे हरी पार्सेकर यांनी सांगितले. आता चळवळ करावी लागेल. हि इमारत पेडणे पालिकेच्या मालकीची असली तरी ती पुरातन वस्तू आहे. ती मोडकळीस आलेली नाही, तिची दुरुस्ती करावी परंतु पूर्णपणे जमीनदोस्त करू नये अशी मागणी हरी पार्सेकर यांनी केली आहे. नवीन इमारत कुठेही बांधा आमची हरकत नाही.परंतु पुरातन वस्तूची शान राखा असे आवाहन हरी पार्सेकर यांनी केले आहे.

पेडणे पालिका इमारत
पेडणे पालिका इमारतDainik Gomantak

शेखर पेडणेकर

स्थानिक जागृत नागरिक शेखर पेडणेकर यांनी बोलताना पेडणे शहरात अनेक जुन्या इमारती आहेत त्या इमारती पेडणेच्या शान आहेत. आपल्या लक्षात आले कि पेडणे पालिकेची जी पुरातन इमारत आहे टी पूर्णपणे मोडून त्या ठिकाणी नवीनइमारत बांधण्याच्या हालचाली सुरु आहेत. सरकारने आणि पालिकेने पेडणे शहराचे थेट कोन्क्रीटीकरण न करता हरित परिसर ठेवण्यासाठी हातभार लावावा , जुनी इमारत आहे तशीच ठेवून तिचे दुरुस्ती आणि सुशोभीकरण करावे, जसे जुन्या अबकारी इमारतीचे दुरुस्ती आणि सुशोभीकरण केले तश्या पद्धतीने पालिकेच्या जुन्या इमारतीचे करावे अशी मागणी शेखर पेडणेकर यांनी केली आहे.

भाजपचे जेष्ठ कार्यकर्त्ये व्यंकटेश घोडगे यांनी प्रतिक्रिया देताना विकासाला कुणाचाच विरोध नाही परतू पेडणे पालिकेने आपली जुनी इमारत आहे तशी ठेवून तिची दुरुती करावी अशी मागणी केली आहे.

पेडणे पालिका इमारत
Goa: केवळ शेतकऱ्यांचे हित जपणार; प्रवीण आर्लेकर

नगराध्यक्ष नागवेकर

पेडणे नगराध्यक्ष उषा नागवेकर यांच्याकडे संपर्क साधला असता हि इमारत पुरातन वास्तू अंतर्गत नोदी नाही. शिवाय हि कमकुवत बनली आहे. आपलेही मत तसेच होते हि इमारत भक्कम असती तर तशीच ठेवून दुरुस्ती करता आली असती परतू इमारतीला ठीक ठिकाणी धोका निर्माण झाल्यामुळे पूर्ण इमारत मोडून तळमजला व वरती दोन मजले उभारण्यात येणार आहे. आणि आहे तशी इमारत ठेवली तर जागाही आणखी मिळणार नाही. पहिल्या टप्प्यात वाचनालय पर्यंत इमारत मोडून प्रकल्प उभारला जाणार आहे हा प्रकल्प उभारल्यानंतर अगोदर मासळी मार्केट जवळील दुकानदाराना या प्रकल्पात त्याना नवीन दुकाने दिल्यानंतर तेथील दुकाने आणि मासळी मार्केट मोडून विस्तारित प्रकल्प उभारला जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष उषा नागवेकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com