मत्स्योद्योग खात्याच्या अधिकाऱ्यांनी वीस नौका जाम केल्या; 364 किलो मासळीचा लिलाव

मासेमारी बंदी पारंपारिक मच्छीमारांना लागू होत नसतानाही संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांचा छळ होत असल्याचा आरोप अखिल गोवा मच्छीमारी बोट मालक संघटनेचे अध्यक्ष फिलीप डिसोजा यांनी केला.
Officials of Fisheries Department jammed twenty boats in goa
Officials of Fisheries Department jammed twenty boats in goaDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: मासेमारी बंदी असताना किनाऱ्यावर स्थानिक होडी मालकांनी मासेमारी केल्याप्रकरणी मत्स्योद्योग खात्याच्या अधिकाऱ्यांनी वीस नौका जाम करून त्यातील 364 किलो मासळीचा लिलाव केला. तर मासेमारी बंदी पारंपारिक मच्छीमारांना लागू होत नसतानाही संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांचा छळ होत असल्याचा आरोप अखिल गोवा मच्छीमारी बोट मालक संघटनेचे अध्यक्ष फिलीप डिसोजा यांनी तसेच त्या पारंपारिक मच्छीमारांनी केला.

(Officials of Fisheries Department jammed twenty boats in goa)

Officials of Fisheries Department jammed twenty boats in goa
टेम्पो-दुचाकीच्या भीषण अपघातात सांताक्रुझ येथील युवक जागीच ठार

सोलार सुंगटे जेव्हा दिसतात तेव्हाच ती पकण्याची गरज असते. अन्यथा ती समुद्रात गायब होतात. यासंबंधी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना अनेकवेळ समजावून सांगितले आहे. परंतु त्यासंबंधी समर्पक उत्तर देण्याऐवजी ते दंड ठोठावतात, असे अखिल गोवा मच्छीमारी बोट मालक संघटनेचे अध्यक्ष फिलीप डिसोजा यांनी सांगितले.

मासेमारी बंदी असतानाही वेळसांव येथे होडयामालकांनी मासेमारी केल्याची माहिती मिळताच संबंधित खात्याचे अधिकारी किनाऱ्यावर दाखल झाले. यावेळी त्यांच्या तावडीत वीस मासेमारी होड्या सापडल्या. त्या जप्त करण्यात आल्या. संबंधित होड्या मालकांवर संबंधित वरिष्ठ अधिकारी योग्य ती कारवाई करतील. जप्त करण्यात आलेल्या मासळीचा सुमारे 47 हजार 320 रुपयांना लिलाव करण्यात आला. सदर कारवाई मत्स्योद्योग खात्याच्या अधीक्षक रोहिता नाईक, सहाय्यक अधीक्षक रोशनी नाईक, अधिकारी रवी रॉड्रिग्ज, सागर नाईक, दीपक कुकळीकर, गोपाळ जुवाटकर यांनी केली. त्यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी वेणाॆ पोलिस स्थानकाचे निरीक्षक डायगो ग्रेसियस व इतर पोलिस उपस्थित होते.

अतिरिक्त मोटर आवश्यक न्यायालयाच्या आदेशानुसार पारंपारिक मासेमाऱ्यांना 9.9 एचपीची मोटर असलेली होडी वापरून मासेमारी करता येते. मात्र समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाताना सुरक्षितेचा उपाय म्हणून आम्ही सोबत अतिरिक्त मोटर ठेवतो. आम्ही बंदी आदेश मोडून मासेमारी केली हे असत्य असल्याचा दावा पारंपारिक मच्छीमारांनी केला आहे.

Officials of Fisheries Department jammed twenty boats in goa
'गोमंतक-तनिष्का' व्यासपीठातर्फे आयोजित धालो-फुगडी स्पर्धेचा निकाल जाहीर

दरम्यान आपण याविषयी मत्स्योघोग मंत्र्यांची भेट घेऊन सदर विषयावर चर्चा करून न्याय मागणार असल्याचे फिलिप डिसोजा यांनी सांगितले. कारण आमचे लहान बोट मच्छीमारी व्यवसायिक सोलार सुंगटे पकडून काही प्रमाणात आपला खर्च भागवतात. त्यांना त्यांच्या बोटी दुरुस्ती कामासाठी काढाव्या लागतात. तेव्हा या काळात सोलार सुंगटावर त्यांचा काही प्रमाणात खर्च भागत असतो. तेव्हा अशा बोट मालकावर कारवाई करणे अयोग्य असल्याचे डिसोझा म्हणाले. आज लहान बोट मालक खूप त्रासात आहेत.

सरकारला आम्ही कसे दिवस काढतात हे माहिती नाही. मच्छीमारी व्यवसाय कायदा सगळ्याच बोट मालकांना लागू होतो. तेव्हा सगळ्या बोट मालकांना एकच कायदा लागू करा असे डीसोजा यांनी सांगितले.अतिरिक्त मोटर आवश्यक न्यायालयाच्या आदेशानुसार पारंपारिक मासेमाऱ्यांना 9.9 एचपीची मोटर असलेली होडी वापरून मासेमारी करता येते. मात्र समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाताना सुरक्षितेचा उपाय म्हणून आम्ही सोबत अतिरिक्त मोटर ठेवतो. आम्ही बंदी आदेश मोडून मासेमारी केली हे असत्य असल्याचा दावा पारंपारिक मच्छीमारांनी केला आहे.

दरम्यान आपण याविषयी मत्स्योघोग मंत्र्यांची भेट घेऊन सदर विषयावर चर्चा करून न्याय मागणार असल्याचे फिलिप डिसोजा यांनी सांगितले. कारण आमचे लहान बोट मच्छीमारी व्यवसायिक सोलार सुंगटे पकडून काही प्रमाणात आपला खर्च भागवतात. त्यांना त्यांच्या बोटी दुरुस्ती कामासाठी काढाव्या लागतात. तेव्हा या काळात सोलार सुंगटावर त्यांचा काही प्रमाणात खर्च भागत असतो. तेव्हा अशा बोट मालकावर कारवाई करणे अयोग्य असल्याचे डिसोझा म्हणाले. आज लहान बोट मालक खूप त्रासात आहेत. सरकारला आम्ही कसे दिवस काढतात हे माहिती नाही. मच्छीमारी व्यवसाय कायदा सगळ्याच बोट मालकांना लागू होतो. तेव्हा सगळ्या बोट मालकांना एकच कायदा लागू करा असे डीसोजा यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com