Anjuna Noise Pollution: सरकारने सुचविलेल्या नावांना ॲमिकस क्युरींची हरकत, ध्वनी प्रदूषण देखरेख समितीसाठी पर्यायी नावे; 25 तारखेला हायकोर्टात सुनावणी

Goa Noise Pollution Monitoring: हणजूण परिसरातील ध्वनी प्रदूषण देखरेख समितीसाठी सरकारने सुचविलेल्या तीन व्यक्तींच्या नावाला ॲमिकस क्युरी व अवमान याचिकादारने हरकत घेतली आहे.
 Goa Noise Pollution Monitoring
high courtDainik Gomantak
Published on
Updated on

Anjuna Noise Pollution Committee Nomination Objection High Court Hearing

पणजी: हणजूण परिसरातील ध्वनी प्रदूषण देखरेख समितीसाठी सरकारने सुचविलेल्या तीन व्यक्तींच्या नावाला ॲमिकस क्युरी व अवमान याचिकादारने हरकत घेतली आहे. ॲमिकस क्युरीने सुचविलेल्या नावांची पडताळणी करण्यासाठी सरकारने वेळ घेतल्याने ही सुनावणी आता येत्या २५ फेब्रुवारीला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने ठेवली आहे.

सरकारने सुचवलेली दोन्ही नावे विचारात घेता येणार नाहीत, कारण ती हितसंबंधांचा संघर्ष निर्माण करतील आणि प्रभावित भागात ध्वनी प्रदूषणाचा सामना करण्यासाठी काम करत असलेल्यांना ती स्वीकारार्ह नाहीत. नायरॉन रेजिनाल्डो डायस आणि रोहन गडेकर नमूद केली आहेत ते दोघेही हॉस्पिटॅलिटी तथा पर्यटन उद्योगात सहभागी आहेत, असा युक्तिवाद ॲमिकस क्युरी नायजेल डिकॉस्ता यांनी केला. त्याऐवजी त्यांनी समितीसाठी तीन पर्यायी नावे सादर केली. त्यामध्ये क्रूसेडर्स जेनी क्रॅस्टो, जेरेमी फेरेरा आणि डोमिनिक परेरा याचा समावेश आहे. हे तिघेही पूर्वीच्या समितीमध्ये होते व त्यांच्यापैकी कोणाचाही पर्यटन आणि नाईटलाईफ उद्योगांशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले.

 Goa Noise Pollution Monitoring
Anjuna Noise Pollution: हणजूणात रात्री उशिरापर्यंत कर्कश आवाजात संगीत; 21 रेस्टॉरंट्सना हायकोर्टाचा दणका

यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) गोवा खंडपीठाने वकिलीपेशात नसलेल्यांची नावे सुचवता येणार नाही का? असा प्रश्‍न केला असता ॲमिकस क्युरी डिकॉस्ता यांनी अशी नावे शोधण्याचा प्रयत्न के जाईल असे सांगितले. यावेळी ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी ॲमिकस क्युरींनी सुचविलेल्या नावांची पडताळणी करण्यासाठी वेळ देण्याची विनंती केली. सूचित केलेल्या व्यक्तींच्या नावांबाबत डिकॉस्ता यांना विश्‍वास असेल तर सरकारचाही त्याला पाठिंबा असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

न्यायालयाचे निरीक्षण

या सुनावणीवेळी गोवा खंडपीठाने नवीन नावांवर विश्‍वास ठेवण्याची गरज अधोरेखित करत एका चांगल्या निवृत्त सरकारी कर्मचाऱ्याची आवश्‍यकता आहे, ज्यावर विश्‍वास ठेवता येईल. जे अहवाल सादर केले जात आहे ते परस्परविरोधी आहेत. त्यामुळे या समितीवरील व्यक्ती या पर्यटन किंवा संगीत वाजवल्या जाणाऱ्या व्यावसायिकांशी संबंध असलेले असू नयेत. त्यांचे काम अहवाल तयार करून तो संबंधित अधिकाऱ्यांना सादर करणे हे असेल, न्यायालयात नव्हे असे स्पष्ट केले.

 Goa Noise Pollution Monitoring
Anjuna Noise Pollution: ध्वनी प्रदूषणप्रकरणी दोन महिन्यांत हणजूण पोलिस स्थानकात 339 कॉल्स, पाच रेस्टॉरंट्स-पब्सना नोटीस; HC मध्ये गोवा पोलिसांची माहिती

गुन्हे दाखल असलेल्या व्यवसायिकांची माहिती द्या

यावेळी अवमान याचिकादार डेस्मंड आल्वारिस यांनी हणजूण (Anjuna) परिसरात ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत त्यांचे व्यवसाय अजूनही सुरू आहेत अशी तक्रार केली असता खंडपीठाने त्यांना ॲमिकस क्युरींना माहिती द्यावी, अशी सूचना केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com