Goa: पणजी येथील कदंब बसस्थानकावरील प्रदर्शनातील 'त्या' माहितीस आक्षेप

पणजी येथील कदंब बसस्थानकावर ‘आझादी का अमृतमहोत्सव’ उपक्रमाअंतर्गत 14 ऑगस्टपासून कुंकळ्ळीतील बंडाची छापील माहिती प्रदर्शनार्थ ठेवलेली आहे.
KTC Bus Stand
KTC Bus StandDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: पणजी येथील कदंब बसस्थानकावर ‘आझादी का अमृतमहोत्सव’ उपक्रमाअंतर्गत 14 ऑगस्टपासून कुंकळ्ळीतील बंडाची छापील माहिती प्रदर्शनार्थ ठेवलेली आहे. त्यात एके ठिकाणी कुंकळ्ळी व आसपासच्या वेळ्ळी, असोळणा, आंबेली व वेरोडा भागातील हिंदू ब्राह्मण भाटकारांनी पोर्तुगिजांविरोधात बंड करून शेत जमिनीद्वारे येणाऱ्या उत्पन्नाचा कर भरण्यास नकार दिला असे म्हटले आहे.

(Objection to 'that' information in the exhibition at Kadamba bus stand in Panajim)

KTC Bus Stand
Siddhi Naik Case: सिद्धी नाईक प्रकरण दडपल्‍याचा वडिलांचा आरोप

तसेच त्यामुळे त्यांच्या जमिनी जप्त केल्या व कोंदादो ऑफ द मार्किस ऑफ फ्रोंतेएर यांच्याकडे सोपविल्या, असेही नमूद करण्‍यात आले आहे. ही माहिती चुकीची असून त्यास आमचा आक्षेप आहे, असे कुंकळ्ळी चिफटन्स मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष ऑस्कर मार्टिन्स यांनी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

क्षत्रिय देसाई सरदारांच्या हत्याकांडानंतर क्षत्रिय देसाई समाजाने कर भरण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्या जमिनी जप्त करण्यात आल्या, हिंदू ब्राह्मण भाटकारांच्या नव्हेत, असे मार्टिन्स म्‍हणाले. कुंकळ्ळीवासीयांनी पोर्तुगिजांविरोधात सोसायटी ऑफ क्षत्रियास अशी सोसिएदाद द एग्रीकोला दोस गावकार्स द कुंकोली इ वेरोडा नावाच्या संस्थेखाली कायदेशीर लढाई लढली. ही लढाई केवळ गोव्यातील न्यायालयातच नव्हे तर पोर्तुगालमधील न्यायालयांमध्येही लढली गेली. नंतर न्यायालयाने जमिनी पुनर्संचयित केल्या व सोसायटीच्या ताब्यात दिल्या ही वस्‍तुस्‍थिती आहे. त्‍यामुळे चुकीची माहिती ताबडतोब दुरुस्त करावी अशी मागणी मार्टिन्स यानी कदंब परिवहन महामंडळाकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच याबाबत सरकारने चौकशी करावी, असेही म्‍हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com