नुवे पंचायतीने मृत व्यक्तीला बजावली नोटिस

या घटनेची गावात सर्वत्र चर्चा होत आहे.
Nuvem Panchayat
Nuvem Panchayat Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: नुवे गावात एक धक्कादायक घटना घडली. येथील पंचायतीने एका मृत व्यक्तीला लेबर सेस भरण्याची नोटिस बजावली. या घटनेची गावात सर्वत्र चर्चा होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीला नोटिस (Notice) बाजवण्याच्या तीन महीने आधीच त्याचा मुलाने लेबर सेस भरला होता. (Nuvem Goa Latest News)

Nuvem Panchayat
Goa Election: उत्पल पर्रीकर निर्णयावर ठाम, अखेर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

ही घटना घडल्यावर, मयत जोस फर्नांडिस यांचा मुलगा कैटानो फर्नांडिस यांनी या संदर्भात पंचायत (Panchayat) कार्यालयात तक्रार दाखल केली. मात्र, पंचायत सचिव अजूनही लेबर सेस भरण्यासाठी दबाव टाकत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Nuvem Panchayat
पणजीकरांनी अनुभवली तेरा वर्षांतील तिसरी सर्वात थंड रात्र

प्रसारमाध्यमांशी बोलताना, फर्नांडिस म्हणाले की, सुरवातीला बांधकाम परवानगी ही माझ्या वडिलांच्या नावावर घेण्यात आली होती. त्याची मुदत संपताच आम्ही ती आमच्या कुटुंबियांचा नावावर करून घेतली. मी सप्टेंबर 2021 मध्ये लेबर सेस भरला आहे .

त्यांनी नुवे (Nuvem) पंचायतीला लेबर सेस भरण्यासाठी दिलेली बेकायदेशीर नोटीस मागे घेण्याची विनंती केली आहे. सध्या अनेक पंचायतींनी संबंधित घरमालकांना तातडीने पैसे भरण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. परिणामी लेबर सेस खूप लोकांसाठी डोकेदुखी झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com