नुवे घरफोडी प्रकरण! कुख्यात 'पारधी गँग'चा गुंड अर्जुन गायकवाडच्या कोठडीत 6 दिवसांची वाढ; अनेक गुन्ह्यांचे धागेदोरे उलगडणार?

Nuvem Burglary Case: मुंबईतून अटक करण्यात आलेला कुख्यात 'पारधी गँग'चा सदस्य अर्जुन गायकवाड याच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने सहा दिवसांची वाढ केली आहे.
Nuvem Burglary Case
Nuvem Burglary CaseDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: दक्षिण गोव्यातील नुवे येथे झालेल्या धाडसी घरफोडी प्रकरणाचा तपास आता अधिक सखोल झाला आहे. या प्रकरणी मुंबईतून अटक करण्यात आलेला कुख्यात 'पारधी गँग'चा सदस्य अर्जुन गायकवाड याच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने सहा दिवसांची वाढ केली आहे. जुनी कोठडी संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता, पोलिसांनी अधिक तपासासाठी कोठडीची मागणी केली होती.

आंतरराज्यीय टोळीचा गोव्यात धुमाकूळ

अर्जुन गायकवाड हा केवळ एका घरफोडीत सामील नसून, तो आंतरराज्यीय स्तरावर सक्रिय असलेल्या 'पारधी गँग'चा एक महत्त्वाचा दुवा आहे. या टोळीने गोव्यात यापूर्वीही अनेक ठिकाणी चोऱ्या आणि घरफोड्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. यापूर्वी पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित दीपक बाबुराव मेंडके (२२) याला अटक केली होती, ज्याची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. मात्र, टोळीचा मुख्य सूत्रधार आणि अन्य साथीदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अर्जुनची चौकशी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

Nuvem Burglary Case
Goa Crime: बायकोच्या निधनाचा धक्का असह्य, अवघ्या 24 तासांत नवऱ्यानही संपवलं जीवन; उत्तर प्रदेशच्या दाम्पत्याचा गोव्यात दुर्दैवी अंत

तपासात महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती

नुवे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान काही अशा 'टिप्स' आणि पुरावे हाती लागले आहेत, ज्यावरून गोव्यात गेल्या काही महिन्यांत झालेल्या अनेक मोठ्या घरफोड्यांमध्ये याच गँगचा हात असल्याचा दाट संशय आहे. ही टोळी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने रेकी करून घरफोड्या करते आणि त्यानंतर राज्याबाहेर पसार होते. अर्जुन गायकवाडच्या चौकशीतून गोव्यातील चोरीचा माल कुठे लपवला आहे आणि या गँगला स्थानिक स्तरावर कोणी मदत केली आहे का, याची माहिती मिळण्याची शक्यता आहे.

पोलीस प्रशासनाची सतर्कता

गोव्यातील (Goa) वाढत्या घरफोड्यांच्या पार्श्वभूमीवर पारधी गँगच्या सदस्याला अटक होणे हे पोलिसांसाठी मोठे यश मानले जात आहे. पोलीस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गौरव नाईक या प्रकरणाचा तांत्रिक आणि मैदानी तपास करत आहेत. अर्जुनला वाढीव कोठडी मिळाल्यामुळे पोलिसांना आता गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यासाठी आणि टोळीच्या कार्यपद्धतीचा पूर्ण उलगडा करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.

Nuvem Burglary Case
Goa Crime: लोखंडी रॉडने अधिकाऱ्यावर केला जीवघेणा हल्ला, वार्का येथील घटना; संशयिताचा जामीन गोवा खंडपीठाने फेटाळला

नागरिकांना आवाहन

पारधी गँगसारख्या टोळ्या अनेकदा रात्रीच्या वेळी सक्रिय असतात. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घराची सुरक्षा यंत्रणा कडक करावी आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com