सावधान! गोव्यात कोरोना रूग्णसंख्येचा आलेख वाढतोय

30 रूग्ण बरे झाले असून, सक्रियरूग्णांची संख्या 549 वर पोहचली आहे.
Goa Corona Update
Goa Corona UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: गोव्यात जवळपास अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर काल एका कोविड मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान, राज्यातील मृतांची संख्या 3,833 वर पोहोचली आहे. चाचणी केलेल्या 1262 नमुन्यांमधून 104 नवीन रूग्ण बाधित झाले आहेत. 30 रूग्ण बरे झाले असून, सक्रियरूग्णांची संख्या 549 वर पोहचली आहे.

(number of corona patients is increasing in Goa)

Goa Corona Update
केंद्राच्या आरोग्यविषयक योजना राबवणार : विश्‍वजीत राणे

राज्यात शेवटचा कोविड मृत्यू 30 मार्च 2022 रोजी नोंदवला गेला होता ज्यामध्ये कोविडमुळे दोघांचा मृत्यू झाला होता.

नागरिकांना बुस्टर डोस घेण्याचे आवाहन

आरोग्य खात्याने नागरिकांना बुस्टर डोस घेण्याचे आवाहन केले आहे. कोरोनामुळे अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे. मागील काही महिन्यांपासून करोना रुग्णसंख्येत घट झाल्याचे निदर्शनात येते. मात्र, आता परत रुग्णसंख्या वाढू लागली आहे.

दरम्यान, राज्यात मान्सूनलाही सुरुवात झाली असून मागील दोन दिवस जाेरदार पाऊस पडत आहे. मागील आठवड्यात 12 करोना रुग्ण सक्रिय होते. पण गेल्या आठवड्यापासून करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली असून सक्रिय रुग्णांचा आकडा 473 वर पोहोचला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com