Candolim Accident: रेंट अ कारची कांदोळीत NRI वृद्ध दाम्पत्याला धडक; 86 वर्षीय पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर

Goa Fatal Accident: उपचारादरम्यान, हरिष यांचा मृत्यू झाला तर चंद्रकांता यांच्यावर उपचार सुरु आहेत. दोघांकडे ब्रिटीश पासपोर्ट आढळून आला आहे.
Candolim Accident
Candolim AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

कांदोळी: रेंट - अ - कराने कांदोळीत वृद्ध दाम्पत्याला जोराची धडक दिली. या धडकेत ८६ वर्षीय पतीचा मृत्यू झाला असून, त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेवर बांबोळीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कळंगुट पोलिसांनी या प्रकरणी ४८ वर्षीय उत्तर प्रदेशच्या पर्यटकाला अटक केली आहे. शुक्रवारी (२५ एप्रिल) सकाळी दहा वाजता हा अपघात झाला.

हरिष चुन्नीलाल सोळंकी (वय ८६) असे या अपघातात मृत्यू झालेल्या वृद्ध एनआरआय व्यक्तीचे नाव आहे. तर, चंद्रकांता चुन्नीलाल सोळंकी (वय ८१) असे या अपघातात जखमी झालेल्या त्यांच्या पत्नीचे नाव आहे त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरु आहेत.

विकी ओमप्रकाश जैन (वय ४८, रा. बलराम नगर, लोणी देहात, गाझियाबाद, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. याप्रकरणी सुदत्ता कापडे या डेड कॉन्स्टेबलने तक्रार दाखल केली आहे.

Candolim Accident
Pahalgam Attack: 'मला रात्री झोप येईना', गोव्यातील प्रसिद्ध टीटोजच्या मालकाने गुड फ्रायडेची कमाई पहलगामच्या जखमींना केली दान

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित विकी कार घेऊन सिक्वेरेतून कंळगुच्या दिशेने जात होते. यावेळी फिशरमन कोव्ह रेस्टॉरंट, कांदोळी येथे भरधाव कारने हरिष आणि त्यांची पत्नी चंद्रकांता यांना धडक दिली. दोघेही या अपघातात गंभीर जखमी झाले.

उपाचारासाठी दोघांनाही बांबोळी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान, हरिष यांचा मृत्यू झाला तर चंद्रकांता यांच्यावर उपचार सुरु आहेत. दोघांकडे ब्रिटीश पासपोर्ट आढळून आला आहे.

पोलिसांनी याप्रकरणी संशयित पर्यटक कार चालक विकी ओमप्रकाश जैन याला अटक केली असून, याप्रकरणी कळंगुट पोलिस अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com