Goa Board Exam: आता दहावी, बारावी परीक्षा द्या मार्च किंवा जूनमध्ये

लवकरच परिपत्रक : न सुटलेले विषय जूनमध्ये सोडवा
Exam
Exam Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास पूर्ण झाला नसल्यास आता मार्चऐवजी जूनमध्ये परीक्षा देता येणार आहे. केंद्रीय शिक्षण मंडळाच्या परिपत्रकानंतर गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तसे परिपत्रक जारी करणार आहे.

मंडळाचे अध्यक्ष भगिरश शेट्ये यांनी दिलेल्या माहितीनुसार कोविड काळात २०२२ मध्ये दहावी आणि बारावीच्या सहामाही आणि वार्षिक या पद्धतीने परीक्षा घेण्यात आल्या. सीबीएसई आणि आयसीएसई या शिक्षण मंडळांनीही परीक्षेची हीच पद्धत ठेवली होती.

अन्य राज्यांच्या मंडळांनी दोन टप्प्यातच परीक्षा घेतल्या होत्या. गेल्या वर्षी सीबीएसई मंडळाने एकच परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय समजेपर्यंत उशीर झाल्याने गोवा आणि हिमाचल प्रदेशाच्या मंडळांनी दोन परीक्षा पद्धती कायम ठेवली.

Exam
आगशी येथे बैलाची अवैध वाहतूक, तक्रारदाराला जीवे मारण्याची धमकी; सात जणांविरोधात गुन्हा

मार्चची परीक्षा टाळण्याची सोय

अगदी परीक्षा शुल्क भरल्यानंतर आता आपण मार्चची परीक्षा देऊ शकत नाही असे विद्यार्थ्याच्या लक्षात आले आणि त्याने ते लेखी स्वरूपात कळवले तर त्याला जूनमध्ये परीक्षा देण्याचा पर्याय दिला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, केंद्रीय मंडळाने परिपत्रक अद्याप जारी करायचे आहे, आम्हाला त्याची प्रतीक्षा आहे. त्यांचे परिपत्रक आले की आम्ही परिपत्रक जारी करणार आहोत. ऑक्टोबर २०११ पर्यंत ऑक्टोबरमध्ये दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्याची पद्धत होती.

तशी परीक्षा पून्हा सुरु कऱण्याचा विचार नाही असे त्यांनी एका प्रश्नावर सांगितले. केंद्रीय मंत्रालयाने नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्याला दोन वेळा परीक्षा देण्याची संधी हवी असे कळवले आहे.

अडीच ऐवजी तीन तासांचा अवधी

दहावी आणि बारावीच्या ६०-७० गुणांच्या परीक्षेसाठी आता अडीच तासाऐवजी तीन तासाचा अवधी दिला जाणार आहे, अशी माहिती शेट्ये यांनी दिली.

यंदा दहावीच्या परीक्षेस २१ हजार तर बारावीच्या परीक्षेस २० हजार विद्यार्थी बसणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com