आता दिव्‍या राणेंकडून ग्रामस्‍थांना अपेक्षा, रस्‍त्‍याकडे दुर्लक्षच

पंचायत व सार्वजनिक बांधकाम खात्याचं या रस्‍त्‍याकडे दुर्लक्षच
Now expect the pernem villagers from Divya Rane Ignoring the road
Now expect the pernem villagers from Divya Rane Ignoring the roadDainik Gomantak
Published on
Updated on

पर्ये : सत्तरीतील केरी ग्रामपंचायत क्षेत्रामधील घोटेली नं. 2 ते धनगरवाडा व पुढे पेळावदापर्यंतच्या रस्त्याची साफ दुर्दशा झाली आहे. हा संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्‍यात आले होते. त्‍यानंतर या रस्‍त्‍याकडे कोणी ढुंकूनही पाहिलेले नाही. गतसाली केरी ग्रामपंचायत क्षेत्रातील अन्य रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात झाले होते. पण स्थानिक पंचायत व सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्‍त्‍याकडे दुर्लक्षच केले. पण आता नवनिर्वाचित आमदार डॉ. दिव्‍या राणे (Divya Rane) यांच्‍याकडून ग्रामस्‍थांना मोठ्या अपेक्षा आहेत.

Now expect the pernem villagers from Divya Rane Ignoring the road
बाणावलीत वेस्टर्न बायपास कामाला नागरिकांचा विरोध, पोलीस बंदोबस्त तैनात

प्रभाग 2 व प्रभाग 4 मधून हा सुमारे 4 किलोमीटर अंतराचा रस्ता असून, तेथून मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. मात्र हा रस्ता बऱ्याच ठिकाणी खड्डेमय बनला आहे. वाहनचालकांना खड्डे चुकविताना मोठी कसरत करावी लागते. यामुळे लहान मोठे अपघातही (Accident) होताना दिसतात.

दरम्‍यान, या रस्ताला गटारव्यवस्था नसल्याने पावसाळ्यात रस्त्यावरून पाणी वाहते आणि पाण्याबरोबर (water) मातीही साचते. पावसाळा संपल्यावर रस्त्यावरील माती काढणे गरजेचे असते. पण बऱ्याच ठिकाणी दगड-माती साचलेली पाहायला मिळते. त्‍यामुळे धोकादायक ठरणाऱ्या या रस्त्याचे त्वरित हॉटमिक्‍सिंग डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com