Swapnil Parab Arrested: मोपा विमानतळ पोलिसांची मोठी कारवाई; कुख्यात गुन्हेगार स्वप्नील परबला बंगळुरुहून अटक

Mopa Airport Police: कुख्यात गुन्हेगार स्वप्नील परब याला 15 हून अधिक गुन्ह्यांमध्ये मोपा विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे.
Swapnil Parab Arrested
Swapnil Parab ArrestedDainik Gomantak

Notorious Criminal Swapnil Parab Arrested: मोपा विमानतळ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कुख्यात गुन्हेगार स्वप्नील परब याला 15 हून अधिक गुन्ह्यांमध्ये मोपा विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. मोपा विमानतळ पोलिसांना 15 विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या एका कुख्यात गुन्हेगाराला अटक करण्यात यश आले आहे.

दरम्यान, पेडण्याचे एसडीपीओ जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वप्नील परब हा वारखंड, पेडणे येथील रहिवासी आहे. त्याच्याविरुद्ध राज्यातील विविध पोलीस ठाण्यांत गुन्ह्यांची नोंद आहे. त्याचबरोबर त्याच्याविरुद्ध राज्यातील विविध न्यायालयांमध्ये वॉरंटही प्रलंबित होते. यापूर्वी, त्याला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करण्यात आले होते, परंतु जामीन मिळाल्यानंतरही त्याचा शोध सुरु होता.

Swapnil Parab Arrested
Goa Murder Case: अल्पवयीन मुलगी, वृद्ध महिला आणि दोन परप्रांतीय कामगार; गोव्यात 10 दिवसांत चार खून

याचदरम्यान आरोपी स्वप्नील परब बंगळुरु येथील एका हॉटेलमध्ये लपून बसल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार मोपा विमानतळ पोलिस स्टेशनचे पीआय नारायण चिमुलकर यांच्या देखरेखीखाली पीएसआय आशिष परब, कॉन्स्टेबल महेश केरकर आणि गौरीश कलंगुटकर यांच्या पथकाने आरोपीला (स्वप्नील) बंगळुरुतील हॉटेलमधून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला गोव्यात आणण्यात आले.

एसडीपीओ दळवी यांनी सांगितले की, आरोपीला (स्वप्नील) यापूर्वी 2021 मध्ये उत्तर जिल्ह्याच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी गोव्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले होते. दरम्यान, एसपी उत्तर अक्षत कौशल आयपीएस यांच्या देखरेखीखाली अटकेची संपूर्ण कारवाई यशस्वीपणे पार पडली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com