Goa Government| विधिमंडळ सचिव, पीआयओना माहिती आयोगाची नोटीस

राज्य माहिती आयोगाने विधिमंडळ सचिव नम्रता उलमन व सार्वजनिक माहिती अधिकारी (पीआयओ) मोहन गावकर यांना नोटीस बजावली आहे.
Goa Government |
Goa Government |Dainik Gomantak

पणजी: नव्याने निवडून आलेल्या आमदारांना विधानसभा कामकाजाची माहिती समजावी यासाठी त्‍यांच्‍याकरिता सरकारने एका तारांकित हॉटेलमध्ये कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेच्या खर्चाचा तपशील माहिती अधिकाराखाली देण्यास राज्य सरकारने नकार दिला. त्यामुळे राज्य माहिती आयोगाने विधिमंडळ सचिव नम्रता उलमन व सार्वजनिक माहिती अधिकारी (पीआयओ) मोहन गावकर यांना नोटीस बजावली आहे.

(Notice of Information Commission to Legislative Secretary, PIO in Goa)

Goa Government |
Goa Death Case: पिता-पुत्राच्या एकाच दिवशी निधनाने राज्यात हळहळ व्यक्त

सामाजिक कार्यकर्ते ॲड. आयरिश रॉड्रिगीस यांनी दाखल केलेल्या याचिकेची आयोगाने दखल घेतली आहे. उलमन व गावकर यांना २० सप्टेंबर रोजी सुनावणीस हजर राहण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. जूनमध्ये आमदारांसाठी दोन दिवसांची प्रशिक्षण कार्यशाळा एका तारांकित हॉटेलमध्ये झाली होती. या खर्चाबाबतचा तपशील ॲड. आयरिश यांनी विधिमंडळ सचिवांकडे मागितला होता. परंतु त्‍यांनी ती माहिती देण्यास नकार दिला. ही माहिती माहिती अधिकाराखाली दिली जाऊ शकत नाही, असे ॲड. आयरिश यांना कळविले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com