गोव्यात गेल्या काही दिवसांपासून सनबर्न फेस्टिव्हल जोरदार विरोध होत आहे. दरवर्षी उत्तर गोव्यातील वागातोर समुद्रकिनाऱ्यावर सनबर्नचे आयोजन केले जाते. मात्र यंदाच्या सनबर्नलाला दक्षिण गोव्यानंतर उत्तर गोव्यातूनही विरोध होऊ लागला आहे.
कामुर्ली येथून या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यास विरोध झाल्यानंतर नवीन जागा म्हणून हणजूणचा विचार केला जाऊ शकतो, मात्र गोव्यातील किनारपट्टीवरील गावांमधून या मेगा म्युझिकल इव्हेंट्स आणि रेव्ह पार्ट्यांना विरोध केला जातोय. .
स्थानिक कार्यकर्ते डेसमंड अल्वारेस आणि डॉ इनासिओ फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली, अनेक किनारी गावांतील रहिवाशांनी सनबर्नसारख्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी करत स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. त्यांच्या मते अशा कार्यक्रमांमधून ड्रग्सचा वापर वाढतो, पर्यावरणाची हानी होते तसेच स्थानिक परंपरेमध्ये व्यत्यय निर्माण होतो.
डेसमंड अल्वारेस यांच्यामते गोवा हे एक छोटंसं राज्य आहे आणि अशा कार्यक्रमांमुळे राज्यातील सांस्कृतिक बांधणी सहज विस्कळीत होते. अशा फेस्टिव्हल्समुळे पर्यावरणाला देखील हानी पोहोचत आहे.
पर्यटन हा गोव्याचा प्रमुख व्यवसाय असल्याने स्थानिकांना भरपूर फायदा मिळतो मात्र मेगा-इव्हेंट्सच्या वाढीमुळे गोव्यातील पायाभूत सुविधांवर वाईट परिणाम होत आहे, असे डॉ इनासिओ फर्नांडिस म्हणालेत.
स्वाक्षरी मोहीमेने आत्तापर्यंत 500 पेक्षा अधिक समर्थक जमा केले आहेत. सनबर्न, TVS मोटोसोल, बॉलीवूड इव्हेंट्स, इंडिया बाइक वीक आणि रायडर मॅनिया यांसारख्या कार्यक्रमांवर सरकारने बंदी आणावी म्हणून हे स्थानिक मागणी करत आहेत.
येत्या आठवड्याभरात या मोहिमेचे निवेदन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि इतर पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची स्थानिकांची योजना आहे. सरकारने स्थानिकांच्या हक्कांचा आदर करावा, सांस्कृतिक ओळख जपावी आणि शाश्वत पर्यटनाकडे लक्ष वळवावे अशी त्यांची विनंती आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.