Youth Festival Bicholim: डिचोलीत उत्तर गोवा जिल्हास्तरीय ‘युवा उत्सव’

शनिवार 13 रोजी उद्‍घाटन : नेहरू युवा केंद्र व रोटरॅक्ट क्लबतर्फे झांट्ये महाविद्यालयात आयोजन
Youth Festival Meet
Youth Festival MeetGomantak Digital Team
Published on
Updated on

Youth Festival Bicholim: युवक -युवतींच्या अंगभूत कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करुन देणारा ''युवा उत्सव'' येत्या शनिवारी (ता.१३) डिचोलीत होणार आहे. नेहरू युवा केंद्राच्या सहकार्याने रोटरॅक्ट क्लबतर्फे झांट्ये महाविद्यालयात हा उत्सव आयोजित करण्यात आला आहे.

उत्तर गोवा जिल्हास्तरीय पातळीवरील हा उत्सव सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार असून, या उत्सवात डिचोलीसह तिसवाडी, पेडणे, बार्देश आणि सत्तरी तालुक्यातील युवक-युवती सहभागी होणार आहेत. अशी माहिती नेहरू युवा केंद्राचे उपसंचालक कालिदास घाटवळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Youth Festival Meet
Benefits Eating Broccoli: डॉक्टर म्हणतात ब्रोकोली खा, वजन कमी करा! कसं? इथे सविस्तर वाचा

डिचोलीत घेतलेल्या या पत्रकार परिषदेवेळी झांट्ये महाविद्यालयाचे उपप्राचार्य राजेश आमोणकर, प्रा. प्रवीण सावंत आणि अर्जुन पळ उपस्थित होते. जिल्हास्तरीयसह राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर युवा उत्सव आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती कालिदास घाटवळ यांनी दिली. या महोत्सवात युवा वर्गाला प्रोत्साहनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यासंदर्भात तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. युवा वर्गाचा प्रतिसादही उत्तम आहे, असे आयोजकांतर्फे सांगण्यात आले.

Youth Festival Meet
Nutmeg Farming: जायफळाची शेती मोठी फायदेशीर, पण त्याच्या उपपदार्थांपासूनही 'अशाप्रकारे' मिळवता येतो आर्थिक लाभ

विजेत्यांना संधी

या महोत्सवात युवक-युवतींसाठी कविता लेखन, मोबाईल फोटोग्राफी, पेंटिंग, भाषण, लोकनृत्य आदी विविध स्पर्धा घेण्यात येणार आहे. १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक-युवकांना या उत्सवात सहभागी होता येईल.

जिल्हास्तरीय पातळीवरील विजेत्यांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे अशी माहिती कालिदास घाटवळ यांनी दिली. या उत्सवात युवक-युवतीनी सहभागी होऊन उत्सव यशस्वी करावा, असे आवाहन उपप्राचार्य राजेश आमोणकर यांनी केले. यावेळी प्रा. नयना सैल, प्रा. अलिशा तावारीस, सोनिया नागेशकर, नंदिनी कामत आदींची उपस्थिती होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com