Goa Agriculture : अनुसूचित जमातींसाठी ‘केव्हीके’ पुढे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न

फळांच्या जातींच्या प्रचार, प्रसारावर भर
Goa Agriculture
Goa AgricultureGomantak Digital Team
Published on
Updated on

अनिल पाटील

Goa Agriculture : केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणानुसार राज्यातील अनुसूचित जमातींच्या (एसटी) आर्थिक विकासाकरता त्यांच्या शेती उत्पादनात वाढ करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. याचाच भाग म्हणून एकात्मिक फळझाड आणि आंतरपिके लागवड व मार्गदर्शन उपक्रम राबवला जात असल्याची माहिती ‘आयसीएआर’चे संचालक डॉ. परवीन कुमार यांनी दिली आहे.

डॉ. परवीन कुमार म्हणाले, अनुसूचित जमातींच्या लाभार्थींकरता उत्तर गोवा कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने हा विशेष उपक्रम राबवला जात असून याअंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातींच्या ज्या लाभार्थींकडे पडीक वा मोकळी जमीन आहे, त्यांनी कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क करावा. या योजनेअंतर्गत ‘आयसीएआर’च्या केंद्रीय किनारी शेती संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञाने संशोधन करून शोधलेल्या आणि किनारी भागात भरघोस उत्पादन देणाऱ्या विविध फळांच्या जातींची फळझाडे मोफत दिली जातात. याशिवाय आंतरपिकांची बियाणीही पुरवली जातात.

Goa Agriculture
Panaji : जागतिक पर्यावरण दिन मांद्रे येथे साजरा

प्रामुख्याने काजूच्या बाळ्ळी २, तिसवाडी 3, गांजे 2, धावे, केएन 2/98, भास्करा, जीबी 2, आरएल 2 या जाती तर मानकुराद आंबा, जायफळ एमएन 1, 2, 3या फळझाडांची लागवड केली जाते. तर एकात्मिक आंतरपिकांच्या अंतर्गत आले, हळद, मिरी, शेवगा या पूरक उत्पन्न देणाऱ्या पिकांची लागवड करण्यात येते. याशिवाय कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ, लाभार्थींच्या प्रत्यक्ष शेतावर जाऊन लागवड आणि फळ पिकांची घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करतात. सध्या सत्तरी, पेडणे, डिचोली तालुक्यातील लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. यापुढेही संबंधित लाभार्थ्यांनी फायदा घ्यावा.

Goa Agriculture
Goa Government Schools: धारबांदोड्यातील 7 शाळांची ‘घंटा’ होणार बंद! पटसंख्येचा अभाव

प्रामुख्याने अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी ही योजना असून या योजनेअंतर्गत मोफत फळझाडे व लागवडीसंबंधीचे मार्गदर्शन केले जात आहे. याचा लाभार्थी शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा. याशिवाय शेतीसंबंधी कोणत्याही सल्ल्यासाठी कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क करावा.

एच.आर.सी. प्रभू, प्रमुख कृषी विज्ञान केंद्र

यापूर्वी आम्ही आंबा, नारळ, लागवड केली होती. आता आंबा, काजू, जायफळ, मिरी, हळदीची लागवड करत आहोत. याचा आम्हा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल.

रामनाथ गावडे, लाभार्थी शेतकरी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com