पणजी: विद्युत खात्यात सध्या 341 कंत्राटी लाईन हेल्पर आणि 119 मीटर रीडर आहेत. या कर्मचाऱ्यांना सेवेत कायमस्वरुपी करण्याचे कोणतेही धोरण सरकारचे नाही. त्यामुळे कायमस्वरुपी पदासाठी जाहिरात आल्यानंतर अर्ज करून योग्य प्रक्रियेतून त्यांची निवड केली जाईल, असे उत्तर वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी आज विधानसभेत. त्यामुळे 15 वर्ष काम केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भवितव्य धोक्यात आले असल्याने त्यांना सेवेत कायमस्वरुपी करण्याची मागणी विरोधकांनी केली.
(no policy to retain contract employees, Minister Dhavalikar informed the Assembly)
आलेक्स सिक्वेरा यांनी कंत्राटाची कर्मचाऱ्यांचे भवितव्य धोक्यात आल्यासंदर्भात प्रलंबित लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर सुदिन ढवळीकर म्हणाले की, खात्यात जेव्हा कंत्राटी पद्धतीवर कर्मचाऱ्यांना घेण्यात आले होते, तेव्हा प्रक्रियेत काहींच्या मुलाखती घेतल्या होत्या. तर,काहींना थेट घेतले होते. काही पदांसाठी जाहिरात देण्यात आली नव्हती. त्यामुळे प्रक्रियेबद्दल दिशाभूल करण्याचा प्रश्नच येत नाही.
पात्रतेसाठी सवलत!
लाईन हेल्पर यांच्यासाठी दहावी उत्तीर्ण पात्रता करण्यात आली आहे. परंतु, यात सवलत देण्याची आणि लेखी परीक्षा रद्द करण्याची मागणी विरोधकांनी केली. यावर मुख्यमंत्र्यी प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप करून सलवतीचे आश्वासन दिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.