म्हापसा
म्हापसा परिसरात उसकई येथील चर्चच्या परिसरात असलेल्या मुख्य रस्त्यावर आज रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास जीए ०७ एन ११११ या चालत्या ऑडी कारगाडीला अचानक आग लागली. दरम्यान, या घटनेमुळे सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा दावा कारमालक मॅलिनो फर्नांडीस (रा. सांताक्रुज, तिसवाडी) यांनी केला आहे.
ही आग शॉर्ट सर्क्रिटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या आगीत कुणीही जखमी झाले नाही. मॅलिनो फर्नांडीस हे कारगाडी घेऊन उसकई येथून पणजकडे जात असताना उसकई चर्चजवळ ते पोहोचले असता कारगाडीच्या इंजिनाला अचानक आग लागली. म्हापसा पोलिस स्थानकाचे हेड कॉन्स्टेबल तुळशीदास नारोजी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
त्या चारचाकी वाहनामधून उसकईहून पणजीच्या दिशेने जात असताना वाटेत उसकई चर्चसमोर गाडीच्या इंजिनमधून धूर येऊ लागला. प्रसंगावधनाने कार थांबवण्यात आली व त्यात असलेले चौघेही गाडीमधून बाहेर आले. त्यानंतर आगीने इंजिनमध्ये पेट घेतला
घटनास्थळी धाव घेऊन जळत असलेल्या कारगाडीची आग विझवण्याचा प्रयत्न म्हापसा अग्निशमन दलाचे जवान आनंद नाईक, एप्रिमो डायस, अर्जुन धावस्कर, विष्णू नाईक, वासुदेव ताटे यांनी केला व त्यात त्यांना यश आले. आग विझवण्यात यश आल्याने संभाव्य वीस लाख रुपयांचे नुकसान वाचवण्यास यश आल्याचा दावा दलाच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे. यासंदर्भात विचारणा केली असता, ही आग नेमकी कशी लागली हे समजू शकले नाही, असे म्हापसा अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
Editing - sanjay ghugretkar
goa goa
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.