Bicholim news today : मुख्यमंत्र्यांमुळे नगरसेवक पडले 'तोंडघशी'; अविश्वास ठराव प्रकरणात फळारींचे पारडे जड

Bicholim Chairperson No Confidence Motion: नगराध्यक्षावरील अविश्वास ठरावावरून डिचोलीत राजकारण तापले असून या नाट्यमय घडामोडीमुळे भाजप गोटात प्रचंड खळबळ माजली आहे. मुख्यमंत्र्यांनी तर या अनपेक्षित घडामोडींची गंभीर दखल घेतली आहे.
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim No Confidence Motion Against Chairperson

डिचोली: नगराध्यक्षावरील अविश्वास ठरावावरून डिचोलीत राजकारण तापले असून या नाट्यमय घडामोडीमुळे भाजप गोटात प्रचंड खळबळ माजली आहे. मुख्यमंत्र्यांनी तर या अनपेक्षित घडामोडींची गंभीर दखल घेतली आहे. अविश्वास ठराव मागे घ्या, अशी निर्देशवजा सूचना त्यांनी हा ठराव आणणाऱ्या गटाला केली आहे, अशी विश्वसनीय माहिती मिळाली आहे. त्यामुळे चर्चेपूर्वीच नगराध्यक्ष कुंदन फळारी यांच्या विरोधातील अविश्वास ठराव बारगळणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.

भाजप पुरस्कृत गटाची सत्ता असलेल्या डिचोली पालिकेच्या सत्ताधारी गटातीलच काही नगरसेवकांनी भाजपबाहेरील नगरसेवकांच्या मदतीने नगराध्यक्ष श्री. फळारी यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला असून, काल (सोमवारी) ठरावाची नोटीस पालिका प्रशासन खात्याला दिली आहे.

या अनपेक्षित घटनेनंतर डिचोलीत भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली. नगराध्यक्ष फळारी यांच्यासह भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन या घडामोडीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे, अशी माहिती मिळाली आहे.

CM Pramod Sawant
Goa Recruitment: भरतीसाठी 'आयोगच' योग्य उपाय! वेर्णेकर, कुएल्हो यांनी मांडली भूमिका

गत पालिका निवडणुकीत डिचोली पालिकेच्या १४ पैकी भाजप पुरस्कृत गटाचे दहा नगरसेवक निवडून आले होते. अन्य एका नगरसेवकाने भाजप गटाला समर्थन दिल्याने ही संख्या अकरावर पोचली होती.

या नगरसेवकांपैकी विद्यमान उपनगराध्यक्ष दीपा पळ, राजाराम गावकर, तनुजा गावकर, नीलेश टोपले, दीपा शिरगावकर, अनिकेत चणेकर यांच्यासह ॲड. रंजना वायंगणकर, ॲड. अपर्णा फोगेरी आणि पांडुरंग (गुंजन) कोरगावकर या नऊ नगरसेवकांनी नगराध्यक्ष कुंदन फळारी यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला आहे. मात्र या प्रकाराची खुद्द मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतल्याने अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या नगरसेवकांची ''कोंडी''झाली आहे.

CM Pramod Sawant
Margao Crime: परतावा द्यायच्या आमिषाने 'योगेश' घालायचा गंडा! शॅडो कौन्सिलकडून पर्दाफाश; ‘त्या’ अधिकाऱ्यांनाही अटक करण्याची मागणी

नगरसेवक तोंडघशी!

मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेमुळे हे नगरसेवक ''तोंडघशी'' पडले आहेत. अविश्वास ठराव दाखल करणाऱ्या नगरसेवक गटाची आज रात्री एक बैठक झाल्याची माहिती मिळाली आहे. अविश्वास ठराव मागे घेण्याबाबत चर्चा झाली आहे, अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com