Panaji Illegal Construction: सहा महिने उलटले तरी अद्याप कारवाई नाहीच...! मळ्यातील बेकायदा बांधकाम प्रकरणी महापालिकेकडून चालढकलपणा

Goa Illegal Construction: सरकारी जमिनीवर अतिक्रमण केलेले बांधकाम १५ दिवसांत पाडण्याचा आदेश पणजी महापालिकेने १३ जून २०२४ रोजी आलेक्स फर्नांडिस (राहुल) व पावलो फर्नांडिस यांना दिला होता.
Panaji Illegal Construction: सहा उलटले तरी कारवाई अद्याप नाहीच...! मळ्यातील बेकायदा बांधकाम प्रकरणी महापालिकेकडून चालढकलपणा
Panaji Illegal ConstructionDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सरकारी जमिनीवर अतिक्रमण केलेले बांधकाम १५ दिवसांत पाडण्याचा आदेश पणजी महापालिकेने १३ जून २०२४ रोजी आलेक्स फर्नांडिस (राहुल) व पावलो फर्नांडिस यांना दिला होता. या मुदतीत हे बांधकाम स्वतःहून न पाडल्यास पणजी महापालिका ते जमीनदोस्त करील व त्यासाठी आलेला खर्च त्यांच्याकडून वसूल केला जाईल, असे आदेशात आयुक्त क्लेन मदेरा यांनी म्हटले होते. ही मुदत टळून सहा महिने उलटले तरी महापालिकेने कारवाई करण्यास चालढकलपणा चालविला आहे.

मळा येथील विनायक महाले यांनी पणजीच्या सिटी सर्व्हे चलता नं. १६०(पी) च्या पीटी शीट क्रमांक ८६ मधील सरकारी जमिनीत आलेक्स फर्नांडिस व पावलो फर्नांडिस यांनी अतिक्रमण करून दुमजली इमारत बांधली आहे व तेथे बेकायदेशीरपणे भाडेपट्टीवर खोल्या दिल्याची तक्रार दिली होती. या बेकायदा खोल्या भाडेपट्टीवर देऊन आलेक्स फर्नांडिस सध्या युकेमध्ये आहे.

Panaji Illegal Construction: सहा उलटले तरी कारवाई अद्याप नाहीच...! मळ्यातील बेकायदा बांधकाम प्रकरणी महापालिकेकडून चालढकलपणा
Illegal Construction in Panaji : सांतिनेज अतिक्रमण प्रकरणी संबंधिताला कारणे दाखवा नोटीस

या भाडेकरूंची माहिती मालकाने पोलिसांत दिली नाही तसेच या खोल्यांमध्ये राहणारे भाडेकरू मद्यप्राशन करून भांडणे सुरूच असल्याने येथील आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना त्रास होत आहे. याप्रकरणी पणजी महापालिकेने तपासणी केली असता या बेकायदा बांधकामासाठी कोणतेच परवाने घेण्यात आलेले नाहीत. ज्या जागेत बांधकामे उभी आहेत ती जागा आलेक्स फर्नांडिस व पावलो फर्नांडिस यांच्या नावावर आहे याचे पुरावे त्यांनी सुनावणीवेळी सादर केलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी ही बांधकामे हटवणे क्रमप्राप्त आहे, असे आदेशात नमूद केले आहे.

Panaji Illegal Construction: सहा उलटले तरी कारवाई अद्याप नाहीच...! मळ्यातील बेकायदा बांधकाम प्रकरणी महापालिकेकडून चालढकलपणा
Illegal Construction in Panaji: रस्त्यासाठी नुकसान भरपाई देऊनही सांतिनेज परिसरात अतिक्रमण!

मागील बाजूने पायऱ्या

पणजीच्या (Panaji) सिटी सर्व्हे चलता नं. १६०(पी)च्या पीटी शीट क्रमांक ८६ मधील सरकारी जमिनीत आलेक्स फर्नांडिस व पावलो फर्नांडिस यांनी अतिक्रमण केलेल्या बांधकामांना पुढील बाजूने सील ठोकण्यात आले असले तरी त्याच्या मागील बाजूने पायऱ्या ठेवल्या आहेत व तेथे भाड्याने लोकांना ठेवण्यात आले आहे. मुदत उलटूनही पणजी महापालिका कोणतीच कारवाई करत नाही, अशी माहिती विनायक महाले यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com