Eliminate plastic : केपे, केपे सरकारी महाविद्यालय जे राज्यातील एक नामांकित महाविद्यालय असून गेल्या कित्येक वर्षांपासून या विद्यालयातील विद्यार्थी प्लास्टिक विरोधी मोहिमेत सहभागी होऊन लोकांमध्ये जागृती घडवून आणण्याचे काम ते करीत आहेत, असे उद्गार समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी काढले.
ते केपे सरकारी महाविद्यालय व केपे नगरपालिकेने आयोजित केलेल्या प्लास्टिक विरोधी कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी नगराध्यक्ष सुचिता शिरवईकर, नगरसेवक प्रसाद फळदेसाई, प्राचार्य ज्योयदीप भट्टाचार्य उपस्थित होते.
प्लास्टिक हा आम्हाला लागलेला एक मोठा शाप असून यातून मुक्त होण्यासाठी आम्ही याचा वापर करणे टाळले पाहिजे, असे फळदेसाई यांनी सांगितले.
केपे सरकारी विद्यालयाने यापूर्वी केपे बाजरामध्ये फिरून लोकांना व दुकानदारांना कागदी पिशव्यांचे वाटप केले होते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजे. प्रदूषण होऊ नये म्हणून प्रत्येक मानवजातीने झटले पाहिजे.
कारण या भूमीवर फक्त माणूस नाही, तर इतरही बरेच जीव राहतात व त्यांचाही सांभाळ करणे आमचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.
केपे सरकारी महाविद्यालयातील एनएनएस विद्यार्थ्यांनी वीस हजार प्लास्टिक बाटल्या एकत्र करून त्या आज केपे पालिकेकडे सुपूर्द केल्या.
यावेळी केपे सरकारी महाविद्यालय ते केपे बाजारात विद्यार्थ्यांनी प्लास्टिकविरोधी घोषणा देऊन लोकांना प्लास्टिक वापरापासून दूर रहावे असा संदेश दिला.
तसेच यापुढे केपे सरकारी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात प्लास्टिक बाटल्यांचा वापर करणार नसल्याचे सांगितले. यावेळी नगरसेवक प्रसाद फळदेसाई, प्राचार्य भट्टाचार्य यांनीही आपले विचार मांडले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.