गोव्यात पक्षाच्या प्रचारासाठी फडणवीसांच्या टीममध्ये नितेश राणेंची एन्ट्री !

देशात गोव्यासह (Goa) पाच राज्यांमध्ये आगामी काळात विधासभा निवडणुका (Assembly Elections) होणार आहेत.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

देशात गोव्यासह (Goa) पाच राज्यांमध्ये आगामी काळात विधासभा निवडणुका (Assembly Elections) होणार आहेत. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यातच गोव्यात सत्तेत असलेल्या भाजपने (Bjp) पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी आपल्या राजकीय प्रचाराचा श्रीगणेशाही केला आहे. पक्षाने गोवा प्रभारी म्हणून महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. यातच आता फडणवीसांच्या टीममध्ये आणखी दोन महाराष्ट्रातील नेत्यांची एन्ट्री झाली आहे. या निमित्ताने या दोन्ही नेत्यांना गोवा विधानसभा निवडणुकांच्या प्रचारामध्ये पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळणार आहे. भाजप आमदार आणि नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे (Nitesh Rane) यांची गोवा विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात फडणवीस यांना मदत करणार आहेत.

Devendra Fadnavis
'मगो उमेदवारांच्या पळवापळीचा आरोप बिनबुडाचा': भाजप प्रदेशाध्यक्ष

दरम्यान, मगोच्या उमेदवारांची पळवापळवी करत असल्याचा आमदार सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांनी केलेला आरोप खोटा व बिनबुडाचा आहे. उमेदवारांची त्याची गरज नाही. भाजप हा राष्ट्रीय पक्ष असून सर्व धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन पुढे जाणारा पक्ष आहे. जर त्यांना निवडणुकीपूर्वी उमेदवारांना सांभाळता येत नाही तर ते निवडणुकीनंतर आमदारांना कसे सांभाळणार असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे (BJP state president Sadanand Tanawade) यांनी मारला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa SIR Guidelines
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com