Miramar Beach Rescue: मिरामार किनाऱ्यावर नौका अडकली, 13 विद्यार्थ्यांवर आले होते संकट; ‘दृष्टी’च्या जीवरक्षकांनी केली सुटका

NIO students rescue Goa: मिरामार किनाऱ्यापासून सुमारे २०० मीटर अंतरावर असलेली मासेमारी नौका वाळूच्या सांड्यावर अडकली. यावेळी नौकेत ‘एनआयओ’चे १३ विद्यार्थी होते.
Miramar Beach Rescue
Miramar Beach RescueDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : दोनापावलस्थित राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेच्या (एनआयओ) १३ विद्यार्थ्यांची सकाळी मिरामार समुद्रकिनाऱ्याजवळ अडचणीत सापडलेल्या मासेमारी नौकेतून ‘दृष्टी’च्या जीवरक्षकांनी सुखरूप सुटका केली. समुद्रातील वाळूच्या पट्ट्यावर नौका अडकल्याने हा प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, मिरामार किनाऱ्यापासून सुमारे २०० मीटर अंतरावर असलेली मासेमारी नौका वाळूच्या सांड्यावर अडकली. यावेळी नौकेत ‘एनआयओ’चे १३ विद्यार्थी होते. यात नऊ विद्यार्थिनी आणि चार विद्यार्थी असून ते सागरी अभ्यास दौऱ्यावर होते.

Miramar Beach Rescue
Illegal Sand Mining: शापोरात बेकायदेशीर रेती उत्खनन, आगरवाडा जैवविविधता मंडळामार्फत तक्रार दाखल

घटनेची माहिती मिळताच तत्काळ जीवरक्षकांनी बचावकार्य हाती घेतले. नुकत्याच कार्यान्वित केलेल्या ‘सीहॉर्स’ या तात्पुरत्या तरंगत्या प्लॅटफॉर्मच्या मदतीने ही सुटका केली. या आधुनिक व्यवस्थेमुळे जलआकस्मिक परिस्थितींमध्ये प्रतिसाद देण्याचा वेळ लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Miramar Beach Rescue
Illegal Sand Mining: अखेर पाच जणांवर गुन्हा, म्हादई नदीच्या पात्रात बेकायदेशीर वाळू उत्खनन; 'दैनिक गोमन्तक'च्या वृत्तानंतर यंत्रणेला जाग

बचावकार्य यशस्वीरीत्या पार पडून सर्व १३ विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com