Mhadei River: कर्नाटकने म्हादईचे पाणी वळवल्‍यास गोव्‍याची हानीच! NIO अहवाल वस्‍तुस्‍थितीचा विपर्यास करणारा; राजेंद्र केरकर

Mhadei River Water NIO Report: यापूर्वी काळी गंगेवरती जे प्रकल्‍प हाती घेतले त्‍याचा फटका गोवा व महाराष्‍ट्राला हत्तींच्‍या आगमनाने बसला आहे.
Rajendra Kerkar, Mhadei River Dispute, Kalasa Banduri
Rajendra Kerkar, Mhadei River Dispute, Kalasa BanduriDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राष्‍ट्रीय समुद्र विज्ञान संस्‍थेच्‍या तीन शास्‍त्रज्ञांनी म्‍हादई संदर्भात जो शोधनिबंध प्रकाशित केला आहे, त्‍या तिन्ही शास्‍त्रज्ञांनी म्‍हादई खोऱ्यात, विशेषत: कळसा-भंडुरा संदर्भात जी पर्जन्‍यवृष्‍टीविषयक आकडेवारी उपलब्‍ध आहे, त्‍याचा उपयोग करून निष्‍कर्ष काढले आहेत. ते वास्‍तवाला धरून नाहीत, असे मत पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांनी व्‍यक्‍त केले आहे.

प्रस्‍तुत प्रतिनिधीशी बोलताना केरकर म्‍हणाले, ‘२०१८ मध्‍ये म्‍हादई जललवादाने कर्नाटकला कळसा-भांडुरा प्रकल्‍पाद्वारे ३.९ टीएमसी पाणी मलप्रभेच्‍या पात्रात वळवण्‍यासाठी जो निवाडा दिला, त्‍याला त्‍यांनी आधारभूत मानले आहे. त्‍यांनी या संदर्भात कर्नाटक, गोवा व महाराष्‍ट्र या तीन राज्‍यांत विखुरलेल्‍या म्‍हादई खोऱ्यातील एकंदर जंगलाचा, तेथील वन्‍यजीव आणि अन्‍य जैविक घटकांचा विचार केला असला तरी त्‍यांनी निष्‍कर्षात या पाणी वळवण्‍याच्‍या प्रकल्‍पाचे अत्‍यल्‍प पर्यावरणीय दुष्‍परिणाम होणार असल्‍याचे म्‍हटले आहे. परंतु, त्‍यांचा हा निष्‍कर्ष वस्‍तुस्‍थितीचा विपर्यास करणारा आहे’.

ते पुढे म्‍हणाले, ‘म्‍हादई खोऱ्याला प्रत्‍यक्ष भेट न देता तेथील सर्वसामान्‍य लोक आणि जैविक संपदेच्‍या घटकांचे जीवनमान या उपलब्‍ध पाण्‍यावर अवलंबून आहे, त्‍या संदर्भात त्‍यांनी शोधनिबंधात कमी प्राधान्‍य दिले आहे. खानापूर नजीकच्‍या निरसे ग्रामस्‍थांनी कर्नाटकने पाट, सिंगूर आणि मडुरा या तीन नाल्‍यांना मलप्रभेच्‍या पात्रात वळवले तर म्‍हादईच्‍या एकंदर जलसंपदेवर त्‍याचे दुष्‍परिणाम होतील,असे अधोरेखित केले आहे.

Rajendra Kerkar, Mhadei River Dispute, Kalasa Banduri
Mhadei River: ‘म्हादई' कर्नाटकला विकण्याचे षडयंत्र गोव्यात सुरू आहे! NIO अहवालावरुन बोरकरांचा घणाघात

देगाव येथून उगम पावणारी म्‍हादई-भांडुरासह असंख्‍य नाल्‍यांना कवेत घेऊन गवळी गावातून कृष्‍णापुरद्वारे गोव्‍यात प्रवेश करते. परंतु या नदीला बारामाही ज्‍या उपनद्या निरंतर पाणी पुरवतात, त्‍यात भांडुराचे पात्र महत्‍वपूर्ण आहे. कर्नाटकचे नियोजित प्रकल्‍प जिथे येऊ घातलेत, तो जंगलभाग आहे. यापूर्वी काळी गंगेवरती जे प्रकल्‍प हाती घेतले त्‍याचा फटका गोवा व महाराष्‍ट्राला हत्तींच्‍या आगमनाने बसला आहे.

Rajendra Kerkar, Mhadei River Dispute, Kalasa Banduri
Mhadei River: कर्नाटकने म्हादईचे पाणी वळवले तरी गोव्यावर परिणाम होणार नाही! NIO संशोधकांचा निष्कर्ष

वन्यजीव पाण्यासाठी गोव्याकडे!

गवे आणि अन्‍य वन्‍यजीवांनी पाण्‍यासाठी गोव्‍याकडे आपला मोर्चा वळवला आहे. कळसा नंतर भंडुरा प्रकल्‍पाच्‍या हाती घेण्‍याने प्रश्‍‍न आणखी गंभीर होणार आहेत. कणकुंबी येथे मानव व अस्‍वल यांच्‍यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. एका महिलेचा मृत्‍यू त्‍याचप्रमाणे सात ते आठ लोकांवर हल्‍ले हे कणकुंबी येथील जंगल नष्‍ट झाल्‍याने व कळसाचे पात्र इतिहास जमा केल्‍याचे फलित आहे, असे केरकर म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com