नव्वद वर्षीय वृद्धाची कोविडवर मात

dulba
dulba
Published on
Updated on

मनोदय फडते

कुडचडे :

पोकरमळ - काले येथील ९० वर्षीय दुलबो शेळके या ज्‍येष्ठ नागरिकाने कोविडवर मात करून सुखरूप घरी परतल्याबद्दल त्यांच्‍या कुटुंबियांनी व स्‍थानिकांनी त्‍यांचे स्‍वागत केले आहे. कोरोनाचा संसर्ग लागू झाल्याने पंधरा दिवसांपूर्वी दुलबो शेळके यांना मडगावातील ईएसआय या कोविड हॉस्पिटलमध्‍ये दाखल केले होते. त्यांच्या वयोमानानुसार चिंता निर्माण झाली होती. पण, पूर्ण आत्मविश्वासाने व हॉस्पिटलमध्‍ये डॉक्टरांनी घेतलेल्या योग्य काळजीमुळे आपण आज ठणठणीत बरा झाल्याचे त्यांनी सांगितले.
घरात आयोजित केलेल्‍या एका समारंभातून दुलबो यांना कोविडचा संसर्ग झाला आणि सर्वांचीच धावपळ उडाली होती. सांगे आरोग्य केंद्राने तातडीने स्‍थानिकांची कोरोना पडताळणी चाचणी घेतली होती. पण, त्यात सर्वजण निगेटिव्ह आले होते. तरीही सर्वजण चौदा दिवस विलगीकरणात राहिल्याने पुढे संसर्ग फैलाव झाला नाही. सलग पंधरा दिवस उपचार घेऊन दुलबो शेळके हे सुखरूप घरी परतल्याने घरच्या मंडळींत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोकरमळवासियांनी समाधान व्यक्त केले आहे.

स्‍थानिकांनी दुलबो यांची भेट घेऊन त्यांची आपुलकीने चौकशी केली असता ईएसआयमधील डॉक्टरांनी आपली चांगली काळजी घेतल्याने आपण लवकर बरा झाल्याचे सांगितले. त्यामुळे सांगे आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या भागात कोविड संख्या शून्य झाल्याने सांगेवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे. अनेक नागरिकांनी दुलबो यांना दीर्घायुष्‍य चिंतिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com