गोव्यात खासगी हॉटेलला कवडीमोल भाडेतत्त्वाने 9 एकर जमीन, पंजाबचे CM म्हणाले, 'कोणालाच माफी नाही'

माजी मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांची या प्रकरणात दक्षता ब्युरो मार्फत आधीच चौकशी केली जात असल्याचे देखील मान म्हणाले.
Punjab CM Bhagwant Mann
Punjab CM Bhagwant MannDainik Gomantak

पंजाबमधील मागील काँग्रेस सरकारच्या काळात गोव्यातील एका खासगी हॉटेलला नाममात्र दरात नऊ एकर जमीन भाडेतत्त्वावर दिल्याचा आरोप करण्यात आला. आता ही जमीन लवकरच खाली केली जाणार असल्याचे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितले. बुधवारी संगरूर येथे झालेल्या जाहीर सभेत मान यांनी याबाबत माहिती दिली.

या प्रकरणात सहभागी असलेल्या कोणत्याही नेत्याला माफ केले जाणार नाही, असे मुख्यमंत्री मान यांनी म्हटले आहे. माजी मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांची या प्रकरणात दक्षता ब्युरो मार्फत आधीच चौकशी केली जात असल्याचे देखील मान म्हणाले.

मान यांनी मागील काँग्रेस सरकारच्या कोषागारमंत्र्यांवरही निशाणा साधत, त्यावेळचे कोषागार मंत्री नेहमी तिजोरी रिकामे असल्याचा दावा करत होते. असा चिमटा मान यांनी काढला.

Punjab CM Bhagwant Mann
कळंगुट, धारगळ, रूमडामळ तणाव आणि G20 बंदोबस्त; गोवा पोलीस स्पायडरमॅनच्या भुमिकेत?

सरकारकडे निधीची कमतरता नाही. सर्वच भागात विकासकामे होतील. मागील सरकारच्या काळात मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला. होशियारपूर येथील एका माजी मंत्र्याच्या घरातून दोन नोटा छापाईची मशीन जप्त करण्यात आली आहे.

यावरून या लोकांनी आपल्या पदाचा गैरवापर करून बेकायदेशीरपणे पैसा कमावल्याचे स्पष्ट झाले आहे. पंजाबची फसवणूक करणाऱ्यांना अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असे मान म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com