Porvorim News: वेगळी वाट चोखाळत स्वीकारली पर्वरीच्या दोन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी

Student Education: नीळकंठ ब्रह्मेश्वर वनदुर्गा विश्वस्त मंडळाने पर्वरीच्या एल.डी. सामंत विद्यालयातील विद्यार्थ्यांची केली निवड
Nilkanth Brahmeshwar Vandurga Board Porvorim
Nilkanth Brahmeshwar Vandurga Board PorvorimDainik Gomantak

मंदिराशी संबंधित ट्रस्ट फारतर धार्मिक कार्याशी जोडलेले असतात. पर्वरी येथील श्री नीळकंठ ब्रह्मेश्वर वनदुर्गा विश्वस्त मंडळाने यातून वेगळी वाट चोखाळत शैक्षणिक क्षेत्रात काम करणे सुरू केले आहे.

यंदा या ट्रस्टने दोन गरजवंत विद्यार्थ्यांची शिक्षणाची वर्षभराची पूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. सोमवारी दुपारी श्री नीळकंठ ब्रह्मेश्वर मंदिरात झालेल्या एका समारंभात या विद्यार्थ्यांच्या मातेकडे धनादेशाच्या माध्यमातून आर्थिक मदत सुपुर्द केली.

कोणत्याही एका विद्यालयात वह्यांसारख्या साहित्याचे वाटप केले तर त्याचा लाभ गरजवंत नसलेल्यांनाही होतो. यामुळे विश्वस्त मंडळाने नेमकी कोणत्या विद्यार्थ्याला गरज आहे याची माहिती घेतली.

ते विद्यार्थी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून चांगली शैक्षणिक कामगिरी करत आहेत का, याची खातरजमा करण्यात आली.

त्यातून पर्वरीच्या एल.डी. सामंत विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची या मदतीसाठी निवड केली. त्यांच्या आईशी झालेल्या चर्चेनंतर या विद्यार्थ्यांच्या शाळेचा खर्च विश्वस्त मंडळाने घ्यावा, असे ठरविले.

चोडणवाडा-पोंबुर्फा येथील विराज नाईक व दिवेश नाईक या विद्यार्थ्यांना ही मदत प्रदान करण्यात आली. यावेळी त्यांची आई नीलम नाईकही उपस्थित होती. त्यांनीच ही मदत विश्वस्त मंडळाचे उपाध्यक्ष प्रशांत गायकर यांच्या हस्ते स्वीकारली.

यावेळी मंडळाचे पदाधिकारी शिवानंद वळवईकर, जितेंद्र चोपडेकर, प्रशांत नाईक, सुरेश भंडारी, मीना गायकर व रोहित वेळीप उपस्थित होते.

Nilkanth Brahmeshwar Vandurga Board Porvorim
New Education Policy In Goa: गोव्यात चार वर्षात नवे शैक्षणिक धोरण लागू होणार; यंदा नववीपासून तर पुढील वर्षी...

विश्वस्त मंडळाचे आवाहन

विश्वस्त मंडळाने याआधी वैद्यकीय शिबिरेही घेतलेली आहेत. दात्यांनी दिलेल्या पैशांतून विश्वस्त मंडळ हे उपक्रम राबवते. असे उपक्रम राबवण्यासाठी दात्यांनी मंडळाला सढळ हस्ते मदत करावी, असे विश्वस्त मंडळाने या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवाहन केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com