मडगाव : रामनगरी-नेसाय येथे लोकांकडून रस्त्याच्या कडेला कचरा (Garbage) टाकला जातो. त्यावर उपाय म्हणून येत्या सहा दिवसांत या भागात कचरा संकलन केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे माजी पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल (Nilesh Cabral) यांनी सांगितले.
काब्राल यांनी आज रामनगरी परिसराला भेट देऊन ही समस्या जाणून घेतली. यावेळी त्यांच्याबरोबर स्थानिक पंचसदस्य व कचरा व्यवस्थापन महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. परिसर यावेळी साफ करण्यात आला.
स्वच्छता राखण्यासाठी आता नागरिकांनीही आपली जबाबदारी उचलण्याची गरज आहे, अन्यथा अशा प्रकारांवर आळा आणण्यासाठी जबर दंड वसूल करण्यासारखे उपाय राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
या परिसरात एका निवासी प्रकल्पाचे सांडपाणी वाहून रस्त्यावर येते. मंत्र्यांचे लक्ष या समस्येकडे ओढले असता सोमवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तज्ज्ञांकडून तपासणी केली जाणार असून त्यात कुणी दोषी सापडल्यास कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. राज्यात पुन्हा एकदा भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. भाजप (BJP) नेत्यांनी आपल्या मंत्रिपदाची शपथ घेताच कामाला सुरुवात केल्याचे दिसत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.