दोन वर्षांत 24 तास पाणी पुरवणार

मंत्री नीलेश काब्राल यांनी ‘आयवा’च्या कार्यक्रमात केली भूमिका स्पष्ट
Nilesh Cabral
Nilesh Cabral Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : स्‍वच्‍छ पाणी हा लोकांचा हक्‍क आहे. राज्‍यात पाण्याचा मुबलक साठा आहे. अत्‍याधुनिक तंत्र आणि यंत्रणेचा वापर करून आगामी दोन वर्षात गोमंतकीयांना २४ तास पिण्याचे पाणी पुरवण्याचा राज्‍य सरकारचा मानस आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी केले. इंडियन वर्क्स असोसएशन गोवा विभागाने (आयवा) जागतिक पाणी आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्‍या मुख्यालय सभागृहात आयोजित सोहळ्यास आयवा गोवाचे अध्यक्ष विक्रमकुमार सावंत, सचिव सत्‍येश काकोडकर, साबांखाचे प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर, संतोष म्‍हापणे, प्रमुख वक्‍ते विलास चौताई आदी मान्‍यवर उपस्‍थित होते. यावेळी बोलताना मंत्री नीलेश काब्राल म्‍हणाले, पाणी ही सर्व मानवजातीची गरज आहे. पाण्याचे संरक्षण आणि संवर्धन होणे आवश्‍यक आहे. अशावेळी राज्‍यांनी नवनवीन तंत्र आणि यंत्रणेची देवाण-घेवाण करायला हवी. जलस्रोत वाचविण्याची गरज असून भूजल पातळी वाढवण्यासाठी एकत्र गांभीयाने विचार करण्याऐवजी राज्‍ये आपापसांत भांडत बसली आहेत. पाण्यावरून भांडत बसण्याऐवजी एकमेकांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली तर सर्वांचेच कल्‍याण होईल, असे काब्राल म्‍हणाले.

Nilesh Cabral
हैदराबाद बस दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती

पाण्याचे संरक्षण, संवर्धन यावर शालेय स्तरावर मार्गदर्शनाची गरज आहे. वाढती लोकसंख्या व पाण्याचे दुर्भिक्ष्य याविषयी विद्यार्थी, तरुणाईत जागृती करायला हवी. अशा उपक्रमांसाठी सरकार सदैव पाठिशी असेल. तसेच आयवाला सर्वोतोपरी सहकार्य करू, अशी ग्‍वाही काब्राल यांनी दिली.

गोव्‍यातील नद्या, जलसाठे, भूजल पातळी याचा विचार करता सध्यस्‍थितीत राज्‍यात पाण्याचा तुटवडा नाही. यापुढे लोकांना अधिक चांगली सुविधा देण्याबरोबरच आगामी दोन वर्षांत 24 तास पाणीपुरवठा करण्याचा आमचा मानस आहे. लोकांनी आपलीही जबाबदारी ओळखून शक्‍य पाण्याचा जपून करावा, असे आवाहनही काब्राल यांनी केलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com