Panaji: ..रात्रीस खेळ चाले! शासनाकडून रस्ते खोदायला बंदी; पणजीत नियम मोडून काम सुरु; राजकीय दबाव असल्याची चर्चा

Panaji Road Excavation Work: पावसाळ्यात जनतेची गैरसोय टाळण्यासाठी कामे केली जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या खोदकामामागे राजकीय दबाव असल्याची चर्चा आहे.
Road Digging Work Panaji
Panaji Road Digging WorkDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: चालू मे महिन्याच्या १५ तारखेपासून रस्त्याच्या खोदकामावर बंदी घातली आहे, तरीही राज्यात सरकारी विभागांनी खोदकाम आणि रस्तेकामे सुरूच ठेवली आहेत. शिवाय पणजीत रात्रीच्या वेळेसही खोदकाम चालत असल्याचे दिसून आले आहे. हा प्रकार म्हणजे प्रशासनाच्या शिस्तीचा भंग आहे.

पावसाळ्यात जनतेची गैरसोय टाळण्यासाठी कामे केली जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या खोदकामामागे राजकीय दबाव असल्याची चर्चा आहे. विद्युत विभाग अजूनही भूमिगत केबल्स टाकत आहे. मलनिस्सारण आणि पायाभूत सुविधा महामंडळामार्फत (एसआयडीसीजीएल) वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम रस्ता दुरुस्ती सुरू आहे.

Sangolda-Chogam Road: सांगोल्डा-चोगम रस्त्याची दयनीय अवस्था; साळगावच्या माजी आमदारांची टीका
Sangolda-Chogam RoadDainik Gomantak

पणजीत शुक्रवारी मध्यरात्री वाहनांची हेडलाईट लावून त्या प्रकाशात काम केले जात होते. विशेष बाब म्हणजे स्मार्ट सिटीअंतर्गत हा रस्ताही तयार केला गेला आहे. याशिवाय काल (शुक्रवारी) पाऊस पडत असतानाही पाटो परिसरात डांबरीकरण केले गेले आहे. जर त्यांनी नियमांचे पालन केले नाही तर त्यांना काळ्या यादीत टाकले जाऊ शकते किंवा भविष्यातील निविदा विचारातून काढून टाकले जाऊ शकते, असा इशाराही कंत्राटदारांना दिला आहे, त्यामुळे त्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

Road Digging Work Panaji
Goa Road: गोव्यात आजपासून रस्ते खोदाल तर खबरदार! 'साबांखा'चा आदेश; सुरक्षिततेसाठी प्रशासनाची कठोर भूमिका

मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे १५ मे नंतर रस्त्यावर कोणतेही खोदकाम करू नये, असे साबांखाच्या अभियंत्यांना बजावले होते. तरीही सध्या जे खोदकाम केले जात आहे, त्यातून ‘आदेश हवेत आणि कामे जोशात’ असा प्रकार सुरू असल्याचे दिसते.

Road Digging Work Panaji
Bhoma Road Issue: "देव खाप्रेश्वराला बाजूला केले, आता आमच्या देवदेवतांनाही बाजूला करण्याचे षडयंत्र सुरू", भोमवासीयांना सावध राहण्याचं आवाहन

विभागीय समन्वयाचा अभाव

१५ मे पासून सुरू होणाऱ्या रस्ते खोदकामावरील बंदी संपूर्ण राज्यात उघडपणे नियामाचे उल्लंघन केले जात आहे.

नियमांचे पालन न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला आहे.

वारंवार रस्ते खोदकाम हे विभागीय समन्वयाचा अभाव दर्शवते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com