NH66 elevated corridor
NH66 elevated corridorDainik Gomantak

NH 66 Closure: उन्नत मार्गासाठी पर्वरी ते घुरीये रस्ता 3 तासांसाठी बंद! सोमवारी घेणार 'ट्रायल रन'; पर्यायी मार्ग कोणते?

NH 66 closure Goa:वाहतूक वळवण्याच्या योजनेची चाचणी सोमवार, १३ ऑक्टोबर रोजी, सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत 'ट्रायल रन'
Published on

पर्वरी: सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) पर्वरी आणि घुरीये दरम्यान सुरू असलेल्या उन्नत मार्गाच्या (Elevated Corridor) बांधकामाला गती देण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग ६६ चा काही भाग वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या वाहतूक वळवण्याच्या योजनेची चाचणी घेण्यासाठी सोमवार, १३ ऑक्टोबर रोजी, सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत 'ट्रायल रन' घेण्यात येणार असून, त्यानंतर महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात येईल.

महामार्गाचे 'हे' महत्त्वाचे टप्पे बंद राहणार

उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकित यादव (IAS) यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, महामार्गाचे दोन महत्त्वाचे टप्पे वाहतुकीसाठी बंद राहतील:

  • अराडी जंक्शन ते होली फॅमिली चर्च जंक्शन

  • ओ'कोकेरो जंक्शन ते शिवाजी चौक

या आदेशानुसार, ओ'कोकेरो ते शिवाजी चौक पर्यंतचा NH-66 चा डाव्या बाजूचा मुख्य मार्ग आणि डॅमियन डी गोवा ते अराडी जंक्शन पर्यंतचा उजव्या बाजूचा मार्ग हा सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील. रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल यांसारख्या आपत्कालीन सेवांना मात्र या मार्गावर प्रवेश दिला जर असल्याची माहिती समोर आली आहे.

NH66 elevated corridor
NH 66 Road Closure Goa: पणजीला जायचं कसं? ओ कोकेरो जंक्शन ते मॉल दे गोवा रस्ता 'पाच महिने बंद'

जड आणि हलक्या वाहनांसाठी

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जड आणि हलक्या वाहनांसाठी विविध मार्ग वळवले आहेत:

पणजीकडे जाणारी जड वाहने: जीवनावश्यक वस्तू आणि इंधन टँकर घेऊन जाणाऱ्या वाहनांव्यतिरिक्त इतर जड वाहने, तसेच आलिशान प्रवासी बस कारसवाडा मार्गे डिचोलीकडे वळवण्यात येतील.

म्हापशाकडे जाणारी जड वाहने: पणजीहून म्हापशाकडे जाणारी जड वाहने पणजी-जुने गोवा -साखळी -डिचोली-अस्नोडा -थिवी या मार्गाचा वापर करतील.

पणजीकडे जाणारी हलकी वाहने: हलकी वाहने अराडी जंक्शन, सुकूर मार्गे डिफेन्स कॉलनीकडे वळवली जातील. ही वाहने कदंब डेपो आणि पुढे बी बी बोरकर रोड मार्गे शिवाजी चौक सेवा मार्ग गाठतील.

म्हापशाकडे जाणारी वाहतूक: ओ'कोकेरो जंक्शनवरून म्हापसाकडे जाणारी वाहतूक चोगम रोड, सांगोल्डा आणि घुरीये मार्गे वळवली जाईल.

स्थानिक नागरिकांसाठी सोयी आणि सुरक्षा व्यवस्था

या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, महामार्गाचे बंद केलेले टप्पे आणि त्याजवळील स्थानिक रहिवासी आणि आस्थापने यांच्यासाठी योग्य प्रवेश बिंदू उपलब्ध करून दिले जातील. याव्यतिरिक्त, वाहतुकीची सुरळीतता आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कंत्राटदार एजन्सीद्वारे वाहतूक मार्शल २४ तास तैनात केले जातील. वाहतूक पोलिसांच्या देखरेखीखाली हे काम चालेल. एजन्सीला महत्त्वपूर्ण ठिकाणी स्पष्ट फलक, वळण निर्देशकआणि नो-पार्किंग बोर्ड लावण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com