'जगप्रसिद्ध टिटोज क्लब विक्रीच्या बातम्या बिनबुडाच्या': रिकार्डो डिसौझा

टिटोज क्लब व्यवसाय विक्रीस काढल्याचे वृत्त बिनबुडाचे असून याउलट या व्यवसायाची व्याप्ती वाढवण्याचे जोरदार प्रयत्न सध्या सुरु असल्याचे टिटोजचे मालक रिकार्डो डिसौझा (Ricardo D'Souza) यांनी कळंगुटात सांगितले.
Ricardo D'Souza
Ricardo D'SouzaDainik Gomantak
Published on
Updated on

कळंगुट: जगप्रसिद्ध ब्रेंड ठरलेला बागा-कळंगुट (Baga-Calangute) येथील टिटोज क्लब व्यवसाय विक्रीस काढल्याचे वृत्त बिनबुडाचे असून याउलट या व्यवसायाची व्याप्ती वाढवण्याचे जोरदार प्रयत्न सध्या सुरु असल्याचे टिटोजचे मालक रिकार्डो डिसौझा (Ricardo D'Souza) यांनी कळंगुटात सांगितले. येथील भ्रष्ट सरकारी व्यवस्थापनाचा कंटाळा आल्याने हा व्यवसाय विक्रीस काढण्याचे निश्चितच मनात आले होते तसेच याबाबतीत चर्चाही सुरु होती  परंतु यासंबंधात जगभरातून आपल्याला  मिळालेला सकारात्मक प्रतिसाद पाहाता आपण हा निर्णय बदलल्याचे डिसौझा यांनी यावेळी सांगितले. गुरुवारी सकाळी  बागा येथील टिटोज क्लबच्या सभागृहात आयोजित एका विशेष पत्रकार परिषदेत रिकार्डो यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे छोटे बंधु डेविड डिसौझा (David D'Souza) उपस्थित होते.

दरम्यान, आपल्या कुटुंबीयांसाठी राजकारण हा विषय नावडता असला तरी येथील भ्रष्ट राजकीय व्यवस्था बदलण्यासाठी आपण सक्रीय राजकारणात उतरणार असल्याचे डिसौझा यांनी यावेळी निक्षून सांगितले. परंतु यंदाच्या निवडणुकीत आपली नेमकी भुमीका काय असेल यांवर त्यांनी भाष्य करण्याचे टाळले. गोव्याच्या किनारी भागातील मोठ मोठे व्यवसाय परप्रांतीय व्यवसायिकांच्या हाती गेलेले आहेत त्यामुळे आपल्या भुमीत करोडोंचा नफा करणार्या अशा व्यवसायिकांचे गोव्यासाठी योगदान काय ? असा सवाल रिकार्डो यांनी यावेळी उपस्थित केला. मुंबईतील झोपडपट्टी विकास योजनेच्या धर्तीवर सरकार राज्यातील बेघरांना मोबत अपार्टमेंट निश्चितच पुरवुं शकते तसा प्रयोग आपण कळंगुटात करण्याचे निश्चित केल्याचे पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नांवर सांगितले.

Ricardo D'Souza
फोंडा उपनगराध्यक्षपदी जया सावंत यांची निवड

गोव्यात (Goa) निर्माणाधीन मोठ मोठ्या हॉटेल व्यवसायिकांचा तीस टक्के नफा त्या त्या भागातील विकास कामावर खर्च करण्याची तरतूद सरकारकडून करण्यात यावी अन्यथा राज्याच्या विकासात योगदान नसलेले मोठ मोठे व्यावसाय हवेतच कशाला असा संतप्त सवाल रिकार्डो डिसौझा यांनी यावेळी केला. दरम्यान, जगप्रसिद्ध टिटोज क्लबची व्याप्ती वाढवण्याचा घाट घातलेल्या डिसौझा बंधुंनी लवकरच राज्यातील पर्यटन क्षेत्रात मोठी भरारी घेण्याच्या उद्देशाने टिटोज क्लबच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करतांना टिटोज हॉटेल ग्रुप्स, टिटोज ट्रेवल्स, टिटोज इट्स आदींंची सुरुवात करण्यात येत असल्याची माहिती शेवटी रिकार्डो तसेच डेवीड डिसौझा यांनी दिली.....

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com