Goa Police: कॉन्स्टेबलनेच तुरुंगात पुरवले मोबाईल आणि ड्रग्ज, गोवा पोलिसांच्या वर्दीवर आणखी एक काळा डाग

Colvale Jail: नव्याने समोर आलेल्या प्रकरणामुळे पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
Goa Police: कॉन्स्टेबलनेच तुरुंगात पुरवले मोबाईल आणि ड्रग्ज, गोवा पोलिसांच्या वर्दीवर आणखी एक काळा डाग
colvale jailDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील जमीन हडप प्रकरणातील मास्टर माईंड सिद्दीकी उर्फ सुलेमान खान याला तुरुंगातून फरार करण्यास आयआरबी कॉन्स्टेबलने मदत केल्याचे प्रकरण ताजे असताना, आणखी एका कॉन्स्टेबलचा कारनामा उघडकीस आला आहे. कोलवाळ तुरुंगात कैद्यांना मोबाईल आणि अमली पदार्थ पुरवल्याच्या आरोपाखाली नव्याने भरती झालेल्या कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोवा पोलिस खात्यात नव्याने भरती झालेल्या पोलिस कॉन्स्टेबलने कोलवाळ सेंट्रल तुरुंगात मोबाईल आणि अमली पदार्थ पुरवठा केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे. सुलेमान खान प्रकरणात अमित नाईक या आयआरबी कॉन्स्टेबलला सेवेतून बडतर्फ केल्यानंतर आता नव्याने समोर आलेल्या प्रकरणामुळे पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

Goa Police: कॉन्स्टेबलनेच तुरुंगात पुरवले मोबाईल आणि ड्रग्ज, गोवा पोलिसांच्या वर्दीवर आणखी एक काळा डाग
AIDS Death Goa: एड्समुळे गोव्यात 15 जणांचा मृत्यू, 2024 मध्ये 240 नव्या रुग्णांची नोंद

गोवा पोलिसांवर प्रश्नचिन्ह

गोवा पोलिसांवर गेल्या काही महिन्यांमध्ये समोर आलेल्या घटनांमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. कोलवा पोलिस स्थानकाच्या पोलिस निरिक्षकाने मारहाण केल्याचा आरोप एका महिलेने केला होता. तसेच, फोंडा येथील अपघातात पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.

नुकत्याच समोर आलेल्या सुलेमान खान प्रकरणात आयआरबी कॉन्स्टेबल अमित नाईक याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले. त्यानंतर आता नव्यानेच भरती झालेल्या कॉन्स्टेबलने तुरुंगात मोबाईल आणि अमली पदार्थ पुरवल्याचा आरोप केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com