Bhandari Community In Goa: भंडारी समाजाच्या नव्या समितीला ‘कारणे दाखवा’ नोटीस; वाद महिनाभर राहणार प्रलंबित

Gomantak Bhandari Samaj: गोमंतक भंडारी समाज संस्थेवर नव्याने बिनविरोध निवडून आलेल्या समितीला जिल्हा संस्था निबंधक कारणे दाखवा नोटीस बजावणार आहे. त्यावर २७ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
Gomantk Bhandari Samaj
Bhandari SamajDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Gomantak Bhandari Samaj Faces Legal Scrutiny

पणजी: गोमंतक भंडारी समाज संस्थेवर नव्याने बिनविरोध निवडून आलेल्या समितीला जिल्हा संस्था निबंधक कारणे दाखवा नोटीस बजावणार आहे. त्यावर २७ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

आज अशोक नाईक समितीने घेतलेल्या मुदतवाढीसंदर्भात निवाडा जिल्हा संस्था निबंधकांनी दिलेला नाही. हा निवाडा आज देण्यात येणार म्हणून सहा तास भंडारी समाज बांधव जिल्हा संस्था निबंधक कार्यालयाबाहेर थांबले होते.

मुंबई उच्च न्यायालयाने याविषयीचा निर्णय घेण्यास जिल्हा संस्था निबंधक तुशांत कुकळ्येकर यांना आजपर्यंतची मुदत दिली होती. अशोक नाईक समितीने बेकायदेशीरपद्धतीने मुदतवाढ घेतली असा दावा करून ॲड अनिश बकाल आणि ॲड. आतिश मांद्रेकर यांनी जिल्हा संस्था निबंधकांकडे दाद मागितली होती. दरम्यान निवडणूक प्रक्रीया ‘जैसे थे’ ठेवा, असा आदेशही जिल्हा संस्था निबंधकांनी जारी केला होता.

त्याला अशोक नाईक यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले असता उच्च न्यायालयाने संबंधितांना योग्य नोटीस न बजावल्याचा मुद्दा ग्राह्य मानून ही प्रक्रीया पून्हा करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार पुन्हा सर्व प्रक्रीया करण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात देवानंद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली नवी समिती निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता जून्या समितीने घेतलेल्या मुदतवाढीसह नव्या समितीचे अधिकारग्रहण हा मुद्दा समोर आला आहे.

Gomantk Bhandari Samaj
Cash For Job घोटाळा करुन तो 'गेला', देणाऱ्यांना मात्र ‘सुतक’; मडगाव इस्‍पितळात कर्मचाऱ्याकडून सहकाऱ्यांना लाखोंचा गंडा

जिल्हा संस्था निबंधकांनी नव्या समितीला कारणे दाखवा नोटीस न बजावल्याचे समोर आल्याने तशा नोटीसा आता बजावण्यात येणार आहेत. दरम्यानच्या काळात उच्च न्यायालयाकडे या सर्व प्रक्रीयेसाठी एक महिन्याची मुदत जिल्हा संस्था निबंधक मागणार आहेत. त्यामुळे भंडारी समाजाचा वाद किमान महिनाभर तरी मिटणार नसल्याचे दिसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Bhandari Community Goa Politics
Cooperative societies financial transparency
Bhandari Community Goa Chief Minister
Goa Bhandari Community Politics
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com