Newborn Baby Found Abandoned : वास्कोत नवजात अर्भकाला अज्ञातांनी उघड्यावर फेकलं

सध्या या अर्भकाला गोमेकॉमध्ये दाखल केलं असून त्याची प्रकृती स्थीर असल्याची माहिती आहे.
Baby
BabyDainik Gomantak
Published on
Updated on

Newborn Baby Found Abandoned : वास्कोतील वाडे परिसरात एका चर्चजवळ शेतात नवजात मुलीचं अर्भक सापडलं आहे. अज्ञातांनी हे स्त्री जातीचं अर्भक टाकल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी अर्भकाला गोमेकॉमध्ये दाखल केलं आहे. याप्रकरणी वास्को पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हाही दाखल केला आहे.

वाडे परिसरात शेतामध्ये एक नवजात अर्भक टाकल्याची माहिती शनिवारी सकाळी वास्को पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत या अर्भकाला ताब्यात घेतलं. हे अर्भक स्री जातीचं असून ते नेमकं कुणी टाकलं याची माहिती मिळू शकलेली नाही. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात कलम 317, 336 आणि गोवा बाल कायद्याच्या कलम 8 नुसार गुन्हा नोंद केला असून या अर्भकाच्या पालकांचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. सध्या या अर्भकाला गोमेकॉमध्ये दाखल केलं असून त्याची प्रकृती स्थीर असल्याची माहिती आहे.

Baby
Goa Crime : मडगावात नवजात अर्भकाला उघड्यावर फेकलं

दरम्यान वास्कोत बेवारस नवजात अर्भक सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकवेळा वास्कोत स्त्री जातीची अर्भकं सापडली आहेत. काही महिन्यांपूर्वी बायणा येथे कोझी अपार्टमेंटमध्ये तिसऱ्या मजल्यावर एका फ्लॅट बाहेर ठेवलेल्या कचराकुंडीत नवजात अर्भक मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती.

तर वास्कोसोबत गोव्याच्या अन्य भागातही अशीच अर्भकं आढळली आहेत. काही दिवसांपूर्वीच मडगावात एक नवजात अर्भक उघड्यावर सापडलं होतं. शिरवडे मडगाव येथे उघड्यावर टाकून दिलेले नवजात अर्भक सापडल्याने खळबळ उडाली होती. हे अर्भक एक मुलगी असल्यानेच टाकल्याची माहिती प्राथमिक तपासातून निष्पन्न झाली होती. दुसरीकडे नेरुळमधील समुद्रकिनारी एका प्लास्टिकच्या पिशवीत टाकलेल्या अवस्थेत नवजात अर्भक सापडल्याची धक्कादायक घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com