Panaji News : नरकासुर असो वा न्‍यू इयर; बियरची होते जास्त विक्री!

Panaji News : किंगफिशर, बडवायझर, कार्ल्सबर्ग, टुबॉर्गला मागणी
Panaji
PanajiDainik Gomantak
Published on
Updated on

धीरज हरमलकर

Panaji News : पणजी, राज्‍यात मौजमजा करण्‍याचे दिवस काही कमी नाहीत. या दिवसांत बियरचा महापूर आलेला असतो. नरकचतुर्दशी असो वा न्‍यू इयर, बियरची विक्री मोठ्या प्रमाणात होते. वाईन शॉपमालकांच्‍या म्‍हणण्‍यानुसार, अशी मौजमजा करण्‍याच्‍या दिवसांत बियरची सर्वाधिक विक्री होते. त्यानंतर व्हिस्की आणि इतर मद्याचा नंबर लागतो.

राज्‍यात दीपावलीच्‍या आदल्या दिवशी जळीस्‍थळी ‘नरकासुर’ दिसतात. संगीतही लावलेले असते. या कर्णकर्कश संगीताच्‍या तालावर अनेक युवक अक्षरश: झिंगून धिंगाणा घालत असतात. मद्याला विशेषत: बियरला उधाण येते. दारूचा महापूरच असतो. बार आणि रेस्टॉरंट फुल्ल असतात. मांसाहारावर भर दिला जातो.

‘निखिल वाईन्स’चे मालक नामदेव हुम्रस्‍कर म्हणाले की, काही खास दिवसांमध्‍ये बियरला मोठी मागणी असते. किंगफिशर, बडवायझर, कार्ल्सबर्ग, टुबॉर्ग बियर खूप खपते. तर, ‘टॉप वाईन्स’चे मालक दत्तप्रसाद नाईक यांनी सांगितले की, गोव्यात लोक बियरची जास्त मागणी करतात. या दिवसात ब्रीझर ड्रिंकचीही विक्री जास्त असते. महिला ब्रीझर पिण्यास प्राधान्य देतात. दारूची विक्री चार ते पाच पटीने वाढते.

७० टक्‍य्‍यांनी वाढतो खप

काही विशिष्‍ट दिवसांत बियरच्या मागणीत ७० टक्क्यांहून अधिक वाढ होते. लोक किंगफिशर, बडवायझर, कार्ल्सबर्ग, टुबॉर्ग बियर खरेदीला पसंती देतात. काही श्रीमंत लोक रेड लेबल, ब्लू लेबल, ब्लॅक डॉग व्हिस्की खरेदी करतात. पण असे असले तरी बियरलाच अधिक मागणी असते, असे पणजीतील प्रसिद्ध ‘टॉम्स वाईन’ शॉपचे मालक रणजीत आमोणकर यांनी सांगितले.

दीपावलीच्‍या आदल्‍या दिवशी आणि नवीन वर्षाच्‍या पूर्वसंध्‍येला लोक मौजमजा करत रात्र जागवतात. या दिवसांत बियरच्या विक्रीत ६० टक्के वाढ होते. त्यानंतर व्हिस्की आणि रमसारख्या हार्ड लिकरची विक्री होते. मॅकडोवेल, इम्पीरियल ब्लू, रॉयल स्टॅग, रॉयल चॅलेंज, ब्लेंडर्स प्राईडची चांगली विक्री होते.

- सावियो आल्मेदा,

‘आल्मेदा वाईन्स’चे मालक

Panaji
Goa Politics: आलेक्स सिक्वेरांनी गाठली थेट दिल्ली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com