Khandepar News: खांडेपार येथील नव्या पुलाचा जोडरस्ता अखेर पूर्ण; वाहतूक होणार सुरळीत

Khandepar News: वादाच्या भोवऱ्यात अडकलेला खांडेपार येथील नव्या पुलाचा जोडरस्ता होणार खुला
New bridge and road at Khandepar finally completed
New bridge and road at Khandepar finally completedDainik Gomantak

Khandepar News: गेला बराच काळ वादाच्या भोवऱ्यात अडकलेला खांडेपार येथील नव्या पुलाचा जोडरस्ता अखेर पूर्ण झाला असून हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात आल्याने आता कधीही हा रस्ता खुला होऊ शकतो. सार्वजनिक बांधकाम खात्याने त्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.

शक्यतो आठवड्याभरात हा रस्ता खुला होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. सुरळीत वाहतुकीसाठी या रस्त्याचे लोकार्पण लवकरात लवकर होणे आवश्‍यक आहे. या रस्त्याचे लोकार्पण मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते तसेच स्थानिक आमदार तथा कृषिमंत्री रवी नाईक यांच्या उपस्थितीत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

खांडेपार येथील कुर्टी बाजूकडील नव्या पुलाच्या जोडरस्त्याचे काम अडून राहिले होते. सुमारे सहा वर्षे हे काम तसेच पडून राहिले. येथील एका प्राचीन घरामुळे या जोडरस्त्याचे काम होऊ शकत नव्हते. शेवटी प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याला दिलासा मिळाला आणि संबंधित कंत्राटदाराने हा जोडरस्ता पूर्ण केला.

हा जोडरस्ता पूर्ण झाला नव्हता, तेव्हापासून या ठिकाणी शेकडो अपघात झाले. त्यात अनेकजणांचे बळी गेले. आधीच उतरणी त्यात पुढील रस्ता अरुंद, वळण घेऊन पुन्हा जोडरस्त्यावर वाहने आणणे यामुळे या ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती आणि त्यामुळेच या रस्त्यावर अपघातांचे सत्र सुरू होते. म्हणून या जोडरस्त्याचे काम शक्य तेवढ्या लवकर पूर्ण होणे आवश्‍यक होते.

New bridge and road at Khandepar finally completed
Make Guirim - Parra road one way | Goa News | Gomantak Tv

युद्धपातळीवर काम

न्यायालयाने हिरवा कंदील दर्शवल्यानंतर या जोडरस्त्याचे काम सुरू झाले आणि युद्ध पातळीवर हे काम पूर्ण करण्यात आले आहे. सर्विस रोडही पूर्ण करण्यात आले आहेत. सद्यःस्थितीत हा रस्ता बंद ठेवण्यात आला आहे, काही जुजबी कामे पूर्ण करायची असल्याने रस्ता खुला करण्यात आला नसल्याची माहिती या खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. येत्या आठवड्याभरात हा रस्ता खुला होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com