Lok Sabha Elections : अतिआत्मविश्वास कधीच बाळगला नाही : डॉ. दिव्या राणे

Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीत पर्येतून सर्वािधक मतदान; भाजपमुळे मला विधानसभेत जाण्याची संधी मिळाली. पर्ये मतदारसंघात माझ्या रूपाने ५० वर्षांनी कमळ फुलले, असे डॉ. दिव्या राणे म्हणाल्या.
MLA Deviya Rane
MLA Deviya RaneDainik Gomantak

विश्वनाथ नेने

Lok Sabha Elections :

पणजी, आम्ही अनेक वर्षे सत्तरीत सत्तेत असलो तरी अतिआत्मविश्वास कधीच बाळगला नाही. विधानसभा निवडणुकीत मी पर्ये मतदारसंघातून १४ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले होते; पण तेच जर मनात ठेवून मी घरी बसले असते तर तो अतिआत्मविश्वास ठरला असता.

विधानसभेवेळी मताधिक्य मिळाले आता नजर लोकसभेच्या मताधिक्यावर आहे, असे प्रतिपादन पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी केले.

लोकसभा निवडणूकीत गोव्यात सर्वाधित ८७.११ टक्के एवढे मतदान हे सत्तरी तालुक्यातील पर्ये मतदारसंघात नोंद झाले. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी ‘गोमन्तक’शी साधलेल्या खास संवादात पर्येतील सर्वाधिक मतदानाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. या सर्वाधिक मतदान नोंदीचे श्रेय त्यांनी आपले पंच, सरपंच, जिल्हा पंचायत सदस्य, बुथ कार्यकर्ते, पन्ना प्रमुख, महिला मंडळे तसेच सर्व कार्यकर्त्यांना दिले आहे.

गोव्याच्या विकासाच्या प्रत्येक प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाठिंबा आहे. गोव्याप्रती नरेंद्र मोदींचे असलेले खास प्रेम हे आम्हा सर्वांना माहिती आहे. राज्य सरकारचा कारभारही अतिशय चांगल्या आणि योग्य पद्धतीने सुरू आहे. मुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांचे माझ्या मतदारसंघातील विकासकामांना पूर्ण सहकार्य मिळत आहे. महिला आमदार म्हणून कोणताही भेदभाव केला जात नाही. भाजपमुळे मला विधानसभेत जाण्याची संधी मिळाली. पर्ये मतदारसंघात माझ्या रूपाने ५० वर्षांनी कमळ फुलले, असे डॉ. दिव्या राणे म्हणाल्या.

MLA Deviya Rane
Goa Election 2024 Voting: गोव्यातील अनेक चर्चमधून भाजपला मतदान न करण्याचे आवाहन; माजी मंत्र्याचा गंभीर आरोप

विश्वजीतांच्या ‘त्या’ विधानाला दुजोरा

काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणूक मतदानाच्या आधी मंत्री विश्वजीत राणे यांच्या विधानाची चर्चा सर्वत्र झाली होती. काँग्रेसमध्ये असूनही माझे वडील प्रतापसिंह राणे यांचा श्रीपाद नाईकांनाच सदैव पाठिंबा होता, असे विधान विश्वजीतनी केले होते. विश्वजीत यांच्या या विधानाला आमदार डॉ. दिव्या राणे यांनी दुजोरा दिला. श्रीपाद नाईक यांचा मनमिळाऊ आणि मृदू स्वभाव यामुळेच प्रतिपसिंह राणे यांनी त्यांना पाठिंबा दिल्याचे डॉ. दिव्या राणे यांनी सांगितले.

भाजपची पक्ष संघटना मजबूत

भाजपची पक्ष संघटना जबरदस्त आहे. पक्षाच्या संघटन कार्यातून मला खूप काही शिकायला मिळत आहे. या लोकसभा निवडणुकीची तयारी पक्षाने विधानसभा निवडणुका झाल्यानंतर लगेच सुरू केली होती. पक्षाची विचारधारा राबविण्यासाठी अतिशय शिस्तीत काम सुरू असते, असे डॉ. दिव्या राणे यांनी सांगितले.

पुढील ३ वर्षांत सत्तरी ‘टॅंकरमुक्त’ करण्याचे ध्येय

होंडा पंचायत क्षेत्रात १५ एमएलडी प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. म्हावशी आणि ठाणे पंचायतीतील पाणी प्रकल्पांचाही प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. दाबोस पाणी प्रकल्पाची क्षमता वाढविण्याचे काम सुरू आहे. पुढील ३ वर्षांत सत्तरी तालुका टॅंकरमुक्त करण्याचे ध्येय मी बाळगले आहे आणि हे सर्व विकासप्रकल्प मार्गी लागल्यानंतर ते ध्येय नक्की पूर्ण होईल, असा विश्वास आमदार डॉ. दिव्या राणे यांनी व्यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com