' हा साप चावला बघा', पिशवीतून मेलेला सर्प घेऊन पोचला इस्पितळात; हातावर लिहिली वेळ; दक्षिण गोव्यातील घटनेने डॉक्टरांची धावपळ

Goa snake bite case: अनेक वर्षांपासून काणकोणात वास्तव्य करून असलेला एक नेपाळी नागरिक त्याला चावलेला सर्प घेऊन मडगावात दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल झाला.
Nepali citizen snake bite Goa
Nepali citizen snake bite GoaDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: काणकोण येथील एका व्यक्तीचा सर्पदंशाने मृत्यू झालेली घटना ताजी असतानाच अनेक वर्षांपासून काणकोणात वास्तव्य करून असलेला एक नेपाळी नागरिक त्याला चावलेला सर्प घेऊन मडगावात दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल झाला.

त्यावेळी इस्पितळात उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने दिलेल्या माहितीप्रमाणे, सर्प घेऊन इस्पितळात आलेल्या त्या नेपाळी नागरिकाने दारू प्राशन केली होती. सर्पाने दंश केल्यावर त्या रुग्णाने त्या सापाला मारले व त्याला पिशवीत घालून तो इस्पितळात आला.

त्याने आपल्या हातावरसुद्धा साप कधी चावला ती वेळ लिहिली होती. त्याबद्दल विचारले असता त्याने सांगितले की जर कदाचित आपण भोवळ येऊन पडलो, तर ती वेळ कळावी म्हणून आपण हातावर लिहिल्याचे सांगितले.

Nepali citizen snake bite Goa
Bronzeback Tree Snake: पश्चिम घाटात या सापाचे अस्तित्व आहे की नाही? गोव्यातील संस्थेच्या संशोधनातून मिळालं उत्तर

साप मेलेला आहे की जिवंत आहे हे न कळल्याने इस्पितळातील डॉक्टर व पारिचारिका तसेच उपस्थित रुग्ण सुरवातीला घाबरले. मात्र, सर्पदंश झालेल्या त्या व्यक्तीला वाचविण्यात इस्पितळातील डॉक्टरांना यश आले.

Nepali citizen snake bite Goa
Snake vs Mongoose: 'कट्टर शत्रू' समोरासमोर! भर रस्त्यात मुंगूस-नागाच्या लढाईचा थरार, पाहा पुढे काय झालं...Video Viral

सर्पदंश झाल्याने इस्पितळात आलेली ती नेपाळी व्यक्ती घाबरलेली नव्हती, परंतु सर्पदंश झाला आहे आणि तो साप पिशवीत घेऊन ती व्यक्ती इस्पितळात आली आहे, हे ऐकून अनेकांची भीतीने गाळण उडाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com