Bicholim: वटपौर्णिमेच्या उत्साहात वर्षानुवर्षे उभा असलेल्या 'त्या' वृक्षाकडे दुर्लक्ष, डिचोलीतील जुनाट वटवृक्षाकडे सुवासिनींची पाठ

Banyan Tree Bicholim: डिचोलीत सर्वत्र वटपौर्णिमेचा उत्साह संचारला असतानाच शहरातील ‘त्या’ वटवृक्षाच्या नशिबी पुन्हा एकदा दुर्भाग्य आले आहे.
Goa Banyan Tree
Banyan Tree Bicholim Dainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: डिचोलीत सर्वत्र वटपौर्णिमेचा उत्साह संचारला असतानाच शहरातील ‘त्या’ वटवृक्षाच्या नशिबी पुन्हा एकदा दुर्भाग्य आले आहे. यंदा तर या वटवृक्षाकडे कोणी ढुंकूनही पाहिले नाही की, एकाही सुवासिनीने या वटवृक्षाची पूजा केली नाही. ही शोकांतिका आहे, शहरातील पुलाकडून आयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूने दिमाखात उभ्या असलेल्या वटवृक्षाची.

आयडीसीकडे जाताना रस्त्याच्या डाव्याबाजूचा हा जुनाट वटवृक्ष म्हणजे कचऱ्याचे ठिकाण बनले होते. सहा-सात वर्षांपूर्वी या वटवृक्षाखाली नेहमी अस्वच्छतेचे दर्शन घडत असे. स्वच्छतादूतांच्या कल्पनेनुसार पाच वर्षांपूर्वी त्यांच्या पुढाकारातून पालिकेने या वटवृक्षाजवळ साफसफाई करून त्याठिकाणी स्वच्छतेसंबंधी जागृती करणारा सूचना फलकही लावला.

Goa Banyan Tree
Porvorim Banyan Tree: "हांव खाप्रेश्वराक हात लावपाक दिवचे ना!" पर्वरीत 2 शतकांपासून उभ्या असलेल्या जुन्या वटवृक्षाचे स्थलांतर सुरू

त्यानंतर पालिकेच्या पुढाकारातून २०१९ साली या वडाजवळ प्रथमच वटपौर्णिमाही साजरी करण्यात आली. काही सुवासिनींनी वडाची पूजा करून वडाभोवती धागा गुंफीत सात फेरेही मारले. केवळ वडासभोवतालचा परिसर स्वच्छ राहावा, हेच ध्येय समोर ठेवून हे पाऊल उचलण्यात आले होते. नंतर ‘कोविड’ महामारीमुळे दोन वर्षे हा वटवृक्ष दुर्लक्षित राहिला. यावर्षी या वटवृक्षाकडे एकही सुवासिनी महिला फिरकली नाही.

Goa Banyan Tree
Vat Purnima: फांदी छाटून पूजा करण्यापेक्षा, वडाचे रोप लावा आणि निसर्गाची भक्ती करा

यंदाही दुर्लक्षच!

गेल्यावर्षीही या वडाजवळ वटपौर्णिमा साजरी झाली नाही. गेल्यावर्षी वटपौर्णिमेच्यापूर्वी स्वच्छतादूतांनी वडासभोवतालचा परिसर स्वच्छ केला होता. त्यामुळे त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात वटपौर्णिमा साजरी होणार, असा अंदाज होता. मात्र, गेल्यावर्षी सायंकाळपर्यंत फक्त एक सुवासिनी या वडाकडे फिरकली. अन्य कोणालाच या वटवृक्षाची आठवण झाली नाही. यंदा तर सायंकाळी या वटवृक्षाची कोणाला आठवणदेखील झाल्याचे दिसले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com