Goa Bhawan : मुंबईत गोवा भवन काळाची गरज : आमदार एल्टन डिकॉस्ता

Goa Bhawan : रुग्णांच्या कुटुंबीयांची सोय व्हावी; दिल्लीच्या गोवा सदनकडेही लक्ष द्या! आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी सरकारच्या वेळकाढू धोरणावर टीका केली.
Elton Dcosta
Elton DcostaDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Bhawan

मडगाव, मुंबईत गोवा भवनाची खासकरून गोव्यातील कर्करोग आणि गंभीर रुग्णांच्या कुटुंबीयांसाठी नितांत गरज असल्याची आठवण मुख्यमंत्र्यांना करून द्यावीशी वाटते, असे काँग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्ता म्हणाले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची अयोध्येतील गोवा भवन बांधण्याची घोषणा प्रत्यक्षात येवो, अशी आशा बाळगूया. नवी दिल्लीतील गोवा सदन आणि गोवा निवास यांची सुधारणा आणि देखभाल प्राधान्यक्रमाने हाती घेणे गरजेचे आहे, असे काँग्रेसचे आमदार डिकॉस्ता यांनी म्हटले आहे.

अयोध्येत गोवा भवन बांधण्याच्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेल्या घोषणेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी सरकारच्या वेळकाढू धोरणावर टीका केली.

मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी अनेक घोषणा केल्या आहेत, ज्या प्रत्यक्षात कधी उतरल्याच नाहीत. गंभीर रुग्णांसह मुंबईत येणाऱ्या गोमंतकीय कुटुंबीयांची सोय होण्यासाठी मुंबईत गोवा भवन बांधणे ही काळाची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

गोवा सरकारने ४ कोटींच्या अंदाजे खर्चाच्या नूतनीकरण कामासाठी ऑगस्ट २०१५ पासून जुहू येथील गोवा भवन बंद केले आहे.

कामाच्या अंतिम पूर्ततेची निर्धारित तारीख जुलै २०२२ होती. भाजप सरकारने जानेवारी २०२३ मध्ये हे काम ३१ मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होईल, असे उत्तर विधानसभेत दिले होते. आम्ही आता फेब्रुवारी २०२४ मध्ये आहोत आणि गोवा भवन कधी सुरू होईल याची कोणालाच माहिती नाही, असे एल्टन डिकॉस्ता यांनी निदर्शनास आणून दिले.

Elton Dcosta
Today's Goa News: गोव्यात दिवसभरात घडलेल्या ठळक घडामोडींचा आढावा, एका क्लिकवर

चाणक्यपुरी येथील गोवा निवासाच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी सरकारने २५.५२ कोटींचा आणि नवी दिल्लीतील गोवा सदनच्या नूतनीकरणासाठी ८.४५ कोटींचा अंदाजे खर्च तयार केला आहे. या दोन्ही खर्चांना गेल्या अनेक महिन्यांपासून शासनाची मंजुरी मिळालेली नाही. शासनाने तातडीने दोन्हींच्या नूतनीकरणाचे काम सुरू करावे.

- एल्टन डिकॉस्ता, आमदार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com