Goa News : तंबाखू नियंत्रणासाठी कडक कायद्याची गरज : आशिम सन्याल

Goa News : तंबाखूचे सेवन करणाऱ्या व्यक्तींमध्ये धूम्रपान न करणाऱ्यांच्या तुलनेत फुप्फुसाचा क्षयरोग होण्याची शक्यता २.५ पट जास्त आहे, तर धूम्रपान करणाऱ्या क्षयरोग रुग्णांना उपचारादरम्यान मृत्यूचा धोका दुप्पट असतो.
Goa
Goa Dainik Gomantak

Goa News :

तिसवाडी, क्षयरोगाविरुद्धच्या लढ्यात भारत आघाडीवर आहे. क्षयरोगाचे उच्चाटन करण्याच्या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गंभीर समस्येचे निराकरण करण्यासाठी एक व्यापक धोरण आखले आहे.

परंतु २०२५ पर्यंत क्षयमुक्त भारत करण्यासाठी तंबाखू नियंत्रणासाठी कडक कायद्याची आवश्यकता आहे, असे आवाहन जागतिक क्षयरोगदिन कार्यक्रमप्रसंगी अशिम सन्याल यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, २०२५ पर्यंत क्षयमुक्त भारत साध्य करण्याचे उद्दिष्ट ठरवून सरकारने एक धोरण सुरू केले. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी तंबाखू नियंत्रण कायदे सक्त करण्याची आवश्यकता आहे. तंबाखू उत्पादनांवर कर आकारणी वाढविण्याची नितांत गरज आहे, कारण क्षय आणि तंबाखू सेवन यांच्यात परस्परसंबंध आहे.

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान आणि जाहिरातींवर बंदी यांसह कडक तंबाखू नियंत्रण उपाय लागू करून, भारतात क्षयरोगाच्या घटना आणि मृत्यू दरांवर तंबाखूच्या वापराचा प्रभाव कमी करू शकतो. तंबाखूच्या वापराचा मुकाबला करण्यासाठी आणि क्षयरोगावरील त्याचा प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी समन्वित प्रयत्न आवश्यक आहेत.

अलीकडच्या वर्षांत लक्षणीय प्रगती असूनही भारतात क्षयरोग हे सार्वजनिक आरोग्याचे एक मोठे आव्हान आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (डब्लूएचओ) जागतिक स्तरावर क्षयरोगाच्या प्रकरणांचा सर्वाधिक भार भारतात आहे. भारतातील क्षयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या मलेरिया, एचआयव्ही एड्स इत्यादींमुळे होणाऱ्या मृत्यूंपेक्षा लक्षणीय आहे, ज्यामुळे परिस्थितीची तीव्रता अधोरेखित होते.

या व्यतिरिक्त तंबाखूच्या वापराचे व्यापक प्रमाण भारतातील खूप जास्त असून अंदाजे १० टक्के लोक तंबाखूजन्य वस्तू वापर करत असल्याने क्षयरोगाचा सामना करण्याच्या प्रयत्नांना आणखी अवघड होतात.

सिगारेट तसेच इतर तंबाखू उत्पादने कायदा (सीओटीपीए) आणि राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम (एनटीसीपी) सारख्या भारत सरकारचे स्तुत्य उपक्रम असूनही, तंबाखूच्या सेवनाला प्रभावीपणे आळा घालण्यासाठी सक्त अंमलबजावणी आणि पुराव्यावर आधारित हस्तक्षेप आवश्यक आहेत.

शिवाय तंबाखू क्षयरोग संबंध कार्यक्षमतेने संबोधित करण्यासाठी आरोग्य क्षेत्रांमधील सहकार्याच्या महत्त्वावर एकमत वाढत आहे. सध्याच्या क्षयरोग पायाभूत सुविधांचा वापर करून बंदिस्त हस्तक्षेप प्रभावीपणे वितरित करण्यासाठी जागतिक क्षय दिवस ही वचनबद्धतेचे नूतनीकरण करण्याची प्रेरणा देण्याची संधी आहे.

Goa
Goa Shigmotsav 2024: ‘वाळपई शिमगोत्सव’ला ‘पर्यटन’ चा बुस्ट !

तंबाखूमुळे क्षयरोग

तंबाखूचे सेवन करणाऱ्या व्यक्तींमध्ये धूम्रपान न करणाऱ्यांच्या तुलनेत फुप्फुसाचा क्षयरोग होण्याची शक्यता २.५ पट जास्त आहे, तर धूम्रपान करणाऱ्या क्षयरोग रुग्णांना उपचारादरम्यान मृत्यूचा धोका दुप्पट असतो.

धूम्रपानामुळे केवळ क्षयरोगाची संवेदनक्षमता वाढते असे नाही, तर उपचाराची प्रभावितता कमी होते आणि ते पुन्हा आजारी पडण्याची शक्यता वाढते. त्यामुळे रुग्ण आणि आरोग्य यंत्रणांना सारखेच सामोरे जावे लागते, असे मत डॉ. शेखर साळकर, प्रख्यात कर्करोगतज्ज्ञ आणि अध्यक्ष नोट, गोवा यांनी व्यक्त केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com