Goa Shigmotsav 2024: ‘वाळपई शिमगोत्सव’ला ‘पर्यटन’ चा बुस्ट !

Goa Shigmotsav 2024: 8 एप्रिल रोजी आयोजन: चित्ररथ, रोमटामेळ, लोकनृत्य, वेशभूषा स्पर्धेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन
Goa Shigmotsav 2024
Goa Shigmotsav 2024Dainik Gomantak

Goa Shigmotsav 2024: राज्यस्तरीय रोमटामेळ स्पर्धा, राज्यस्तरीय चित्रस्पर्धा, राज्यस्तरीय वेशभूषा स्पर्धा व राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धा आदींचे आयोजन 8 एप्रिल रोजी वाळपईत करण्यात येणार आहे.

यासंबंधीची बैठक पार पडली असून या बैठकीला समितीचे उपाध्यक्ष विनोद शिंदे, नगराध्यक्ष तथा स्वागताध्यक्ष प्रसन्न गावस, उपाध्यक्ष राजश्री काळे ,देवयानी गावस, समितीचे सचिव उदय सावंत, खजिनदार प्रसाद खाडीलकर, व्यवस्था प्रमुख उदयसिंग राणे, कार्यक्रम प्रमुख मिलिंद गाडगीळ, नगरसेवक विनोद हळदणकर,सेहझिन शेख आदींची उपस्थिती होती.

या बैठकीत पूर्वतयारीबाबत सविस्तरचर्चा करण्यात आली. यावेळी प्रमुख समिती व विविध समित्यांची नियुक्ती करण्यात आली.

बैठकीत प्रसन्न गावस यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष विनोद शिंदे यांनी सांगितले,की सत्तरीतील सर्व नागरिकांनी या लोकोत्सवात भाग घ्यावा व उत्सव यशस्वी करावा.लोकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व नागरिकांनी सहकार्य करावे.

सचिव उदय सावंत यांनी मागील लोकोत्सवाचा संपूर्ण आढावा घेतला. या समितीचे अध्यक्ष विश्वजीत राणे, कार्याध्यक्ष आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या मार्गदर्शनाखाली या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Goa Shigmotsav 2024
पेन्शनच्या प्रतीक्षेत महिलेने घालवली 46 वर्षे, हायकोर्टाने निकाली काढले प्रकरण; कलेक्टरला दिला आदेश

समिती अध्यक्षपदी विश्‍वजीत राणे

अध्यक्ष आरोग्य मंत्री विश्‍वजीत राणे,कार्याध्यक्ष आमदार डॉ. देविया राणे, स्वागताध्यक्ष,नगराध्यक्ष प्रसन्न गावस, उपाध्यक्ष माजी आमदार नरहरी हळदणकर, सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंदे, होंडा जिल्हा पंचायत सभासद सगुण वाडकर ,केरी जि. पंचायत सदस्य देवयानी गावस ,नगरगाव जि. पं. सदस्य राज्यश्री काळे, सचिव उदय सावंत, खजिनदार प्रसाद खाडीलकर, उपखजिनदार उदयसिंग राणे, सभासद नगरसेवक शराफत खान ,रामदास शिरोडकर ,अनिल काटकर ,फैझल शेख, विनोद हळदणकर ,वसईद्दीन सय्यद, सरफराज सय्यद ,निर्मला साखळकर, सेहजीन शेख.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com