Goa News: आदिवासी संस्कृतीसाठी संशोधन केंद्राची गरज

साहित्याला हवे योग्य व्यासपीठ: केपेतील दुसऱ्या आदिवासी साहित्य संमेलनात व्यक्त झाला सूर
Goa News
Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यातील आदिम आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धनासाठी आदिवासी संशोधकांनीच पुढे येऊन हे आव्हान स्वीकारावे. तसेच राज्यात आदिवासी संशोधन केंद्र सुरू करण्याची गरज आहे, असा सूर दुसऱ्या आदिवासी संमेलनात समाजातील मान्यवरांनी व्यक्त केला.

ट्रायबल रिसर्च सेंटर, आदिवासी साहित्य संघ आणि कला व सांस्कृतिक संघातर्फे केपे महाविद्यालय संकुलात आज दुसरे आदिवासी साहित्य संमेलन पार पडले. संमेलनात प्रसिद्ध लघुपट दिग्दर्शक के. स्टॅलिन संमेलनाध्यक्ष पांडुरंग गावडे, सभापती रमेश तवडकर, तेजश्री कुंभार, डॉ. मधू घोडकीरेकर, जुवाव फेर्नांडिस, प्रकाश वजरीकर, संदेश प्रभुदेसाई, कांता गावडे, सूर्या गावडे, सुशीला मेंडिस आदींची उपस्थिती होती.

पुरातन वस्तू, पुस्तकांचे प्रदर्शन : कार्यक्रमात आदिवासी साहित्यिक व संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. आदिवासी समाजातीला खरे स्वरूप लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संमेलनात विविध पुरातन वस्तूंचे, पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. ‘आमच्या संस्कृतीचा अभ्यास आम्हीच करून ती जगासमोर लिखित स्वरूपात आणण्याचा’ संकल्प या संमेलनात व्यक्त करण्यात आला.

आदिवासी समाजातील सर्व घटकांना एकत्र मोठ्या व्यासपीठावर आणणे हा संमेलनाचा मुख्य उद्देश आहे. समाजातून येणाऱ्या साहित्याला योग्य न्याय मिळायला हवा. आदिवासी समाजाने आपले अस्तित्व नाकारता कामा नये. उलट आपल्याच पूर्वजांनी ही भूमी वसविली आणि संस्कृती रुजविली याचा सार्थ अभिमान बाळगावा.

- पांडुरंग गावडे, संमेलनाध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

goa tribal welfare department schemes
Goa Panchayat Auto Approval
 Goa University PHD Controversy
Goa Tribal Political Reservation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com