NDRF Center In Goa: आता आपत्कालीन काळात पुण्यातून नाही बोलवावे लागणार जवान; गोव्यात उभं राहणार 'एनडीआरएफ' केंद्र

New NDRF Center In Goa: सर्व पंचायती, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व इतर अधिकाऱ्यांच्या झालेल्या आभासी बैठकीत महसूल खात्याचे साहाय्यक सचिव सुरेंद्र नाईक यांनी ही माहिती दिली.
Emergency rescue operations in Goa
NDRF CenterDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर आम्हाला पुणे येथून 'एनडीआरएफ'चे जवान पाठविण्यात येतात. ते येथे पोहोचेपर्यंत वेळ लागतो. त्यामुळे अस्नोडा येथे २५ हजार चौरस मीटर जमीन 'एनडीआरएफ'ला देण्याचे निश्चित झाले असून त्यांचे प्रादेशिक केंद्र लवकरच उभारण्यात येईल, असे महसूल खात्याचे साहाय्यक सचिव सुरेंद्र नाईक यांनी शनिवारी (३१ मे) सांगितले.

सर्व पंचायती, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व इतर अधिकाऱ्यांची आज आभासी बैठकीत झाली. त्यात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही पंचायत सदस्यांशी संवाद साधला.

ते म्हणाले, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नागरिकांना पावसाळ्यात कोणत्याही प्रकारच्या आपत्तीला सामोरे जावे लागू नये, यासाठी प्रयत्नरत असून पंचायत, नगरपालिका तसेच प्राधिकरणानेही ज्या काही मान्सूनपूर्व अडचणी येत आहेत, त्या दूर कराव्यात. कोणत्याही प्रकारची आपत्ती ओढवणार नाही, यासाठी सर्वांचे सहकार्य गरजेचे आहे.

Emergency rescue operations in Goa
Govind Gaude: गोविंद गावडेंना मंत्रिपदावरुन डच्चू, दिल्लीत झाला निर्णय; पण मुख्यमंत्री म्हणतात, 'संदेश अजून आला नाही'

धोकादायक इमारतींवर कारवाई

राज्यातील सरकारी किंवा खासगी ज्या इमारती धोकादायक आहेत, अशा इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. खाण क्षेत्रात पाणी साचल्याने अनेक अपघाताच्या घटना घडतात. अशा ठिकाणी कुंपन उभारावे, यासाठी दोन्ही जिल्हाधिकारी कार्यालयांना प्रत्येकी ७५ लाख रुपये देण्यात आले आहेत, असे नाईक म्हणाले.

१०० कोटींची 'एआय' उपकरणे

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडशी गोवा सरकारने सामंजस्य करार केला असून येत्या काळात ते आम्हाला अत्याधुनिक एआय आधारित आपत्कालीन व्यवस्थापनासाठी लागणारी उपकरणे पुरविणार आहेत. यासाठी सुमारे १०० कोटी खर्च येणार असून यासंबंधीचा प्रस्ताव केंद्राला पाठविण्यात आल्याचे नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com